Delhi landfill Site: कचरा डेपोंमधील धुमसती आग अन् गुदमरता श्वास... दिल्लीतील ३ लँडफिल साईट्स उठले नागरिकांच्या जीवावर!

Delhi landfill Site Fire: दिल्लीतील भालस्वा आणि ओखला हे दोन लँडफिल साइटही स्थानिक लोकांसाठी त्रासदायक ठरली आहेत.
Delhi landfill Site Fire:
Delhi landfill Site Fire:Saamtv

दिल्ली|ता. २२ एप्रिल २०२४

दिल्लीतील गाझीपूर लँडफिल साइटवर रविवारी संध्याकाळपासून लागलेली आग अद्याप विझलेली नाही. कचरा डेपोवर अद्याप आग धुमसत असल्याने संपूर्ण परिसर विषारी वायू आणि धुराने भरला आहे. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील भालस्वा आणि ओखला हे दोन लँडफिल साइटही स्थानिक लोकांसाठी त्रासदायक ठरली आहेत.

कचरा डेपोंमुळे आरोग्य धोक्यात..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीच्या गाझीपूर लँडफिल साइटवर आग लागण्याच्या अशा घटना सर्रास घडतात. २०१९ मध्ये या कचऱ्याच्या डेपोंना आग लागण्याच्या सहा घटना घडल्या. २०२० मध्ये ८ वेळा तर २०२१ मध्ये गाझीपूरच्या कचऱ्याच्या डेपोंना आग लागण्याच्या चार आणि २०२२ मध्ये पाच घटना घडल्या.

त्याचबरोबर २०१९ मध्ये ओखला लँडफिल साइटवर आगीच्या २५ घटना घडल्या. २०२० मध्ये सहा आणि २०२२ मध्ये दोन घटना नोंदवण्यात आल्या. भालस्वा लँडफिल साइटबद्दल सांगायचे तर, 2019 मध्ये कचऱ्याच्या डोंगराला आग लागण्याच्या सहा घटनांची नोंद झाली आहे. २०२० मध्ये एक घटना उघडकीस आली होती. २०२१ मध्ये त्यात वाढ होऊन २१ झाली, तर २०२२ मध्ये अशा १४ आगीच्या घटना घडल्या.

Delhi landfill Site Fire:
Sri Lanka Car Racing : श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये मोठी दुर्घटना; लहान मुलासह ७ जणांचा मृत्यू २३ जखमी

राजकारण तापलं!

दरम्यान, वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा तसेच धुराचा प्रचंड त्रास सहन करायला लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच यावरुन राजकीय आरोप- प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी यावर बोलताना अरविंद केजरीवाल शासित दिल्ली महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली. गाझीपूरच्या लँडफिल साइटमध्ये आग लागली असून धुराचे लोट उठत आहेत, असे आरोप केले आहेत. तसेच आज अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत पण दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय आणि महापौर डॉ.शेली ओबेरॉय यांनी घटनास्थळी भेटही दिली नसल्याचेही भाजपने म्हटले आहे.

Delhi landfill Site Fire:
Kolhapur News: कोल्हापुरात टोळीयुद्धाचा भडका, तरुणावर अंदाधुंद गोळीबार; नागरिक धास्तावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com