Delhi: धुक्यामुळे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात; 12 जण जखमी!

धुक्याने एक्स्प्रेस वेवर कहर करायला सुरुवात केली आहे.
Delhi: धुक्यामुळे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात; 12 जण जखमी!
Delhi: धुक्यामुळे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात; 12 जण जखमी!Saam Tv

दिल्ली: धुक्याने एक्स्प्रेस वेवर Express Way कहर करायला सुरुवात केली आहे. गाझियाबादच्या मसुरी भागात मेरठ एक्सप्रेसवेवर धुक्यामुळे सुमारे 30 वाहने एकमेकांवर आदळली आहेत. सुदैवाने या अपघातात कोणीही जीवित हानी झाली नाही. धुक्यामुळे झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी बराच वेळ जाम होता.

हे देखील पहा-

पोलिसांनी सांगितले की, वाहनांच्या धडकेत सुमारे 12 जण जखमी झाले असून यापैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने एक्स्प्रेस वेवरून हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 30 वाहने एकमेकांवर आदळली. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

Delhi: धुक्यामुळे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात; 12 जण जखमी!
"आर्यन खानचे अपहरण करून वानखेडेंनी मागितली खंडणी"

प्रदूषणात वाढ झाल्यामुळे दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याचे प्रमाण वाढले आहेत. अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 1000 च्या जवळ पोहोचला आहे. दिल्लीपासून गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडापर्यंत बहुतेक ठिकाणी AQI पातळी 999 आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना त्रास होत आहे. हिवाळा सुरू झाल्याने धुक्याने दार ठोठावले असतानाच, प्रदूषण आणि धुक्यामुळेही त्रास होत आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com