"आर्यन खानचे अपहरण करून वानखेडेंनी मागितली खंडणी"

चौकशीसाठी आता दोन एसआयटी स्थापन...
"आर्यन खानचे अपहरण करून वानखेडेंनी मागितली खंडणी"
"आर्यन खानचे अपहरण करून वानखेडेंनी मागितली खंडणी"Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : मुंबईतील कार्डेलिया क्रूज पार्टी प्रकरणामुळे राज्यातील ड्रग्स कनेक्शन बद्दल आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. मागील गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या प्रकरणात केलेल्या कारवाईवर मंत्री नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर काही पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंबाबत अनेक गौप्यस्फोट करत आरोपसत्र सुरु केले.

दरम्यान, (काल ता. ५) शुक्रवारी आर्यन खान केसचा तपास एनसीबीच्या एसआयटीकडे SIT देण्यात आला आहे. याबद्दल समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, मला या तपासातून हटवण्यात आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेतर्फे व्हावा यासाठी मीच न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ही एक सुरुवात आहे;

नवाब मलिक यांनी शुक्रवारी ट्विट करून म्हटलं की, समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणासह एकूण 5 प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आलं आहे. अशी 26 प्रकरणं असून त्यांचा तपास होण्याची गरज आहे. ही एक सुरुवात आहे. व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरंच काही करण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही ते करू असंही नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटलं होतं.

आज शनिवारी नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलंय. यात नवाब मलिक यांनी म्हंटल आहे की, समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी आपणच केली होती. आर्यन खानचे अपहरण केलं आणि खंडणी मागितली या प्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य State and Center अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. बघुयात आता, या दोन्ही पैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा खरा चेहरा समोर आणतं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com