Pm Narendra Modi News: अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Latest National Political News: अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
Delegation of the US Congress met Prime Minister Narendra Modi
Delegation of the US Congress met Prime Minister Narendra ModiSaam Tv

Pm Narendra Modi News: अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील आठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिष्टमंडळात इंडिया कॉकसचे डेमोक्रॅटिक सह-अध्यक्ष रोहित खन्ना, इंडिया कॉकसचे रिपब्लिकन सह-अध्यक्ष माइक वॉल्ट्ज, प्रतिनिधी एड केस, कॅट कॅमॅक, डेबोरा रॉस, जास्मिन क्रॉकेट, रिच मॅककॉर्मिक आणि श्री ठाणेदार यांचा समावेश होता.

Delegation of the US Congress met Prime Minister Narendra Modi
Beed News: धनंजय मुंडे यांच्या होम पीचवर शरद पवारांची सभा, बीडमध्ये राजकारण तापलं...

भारतात शिष्टमंडळाचे स्वागत करताना, पंतप्रधानांनी भारत-अमेरिका संबंधांना अमेरिकन काँग्रेसकडून दिल्या जात असलेल्या सातत्यपूर्ण आणि द्विपक्षीय समर्थनाची प्रशंसा केली.

अध्यक्ष बायडेन यांच्या निमंत्रणावरून जूनमध्ये केलेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्याची पंतप्रधानांनी आठवण काढली. या दौऱ्यात त्यांना अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दुसऱ्यांदा संबोधित करण्याची संधी मिळाली होती. (Latest Marathi News)

Delegation of the US Congress met Prime Minister Narendra Modi
Swadhar Yojana: उच्च शिक्षणासाठी सरकार देत आहे 43 हजार, जाणून घ्या काय आहे ‘स्वाधार’ योजना

भारत-अमेरिका जागतिक धोरणात्मक भागीदारी सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याप्रति आदर आणि जनतेमधील मजबूत संबंधांवर आधारित असल्याचे पंतप्रधान आणि अमेरिकन शिष्टमंडळाने अधोरेखित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com