Ration Card आधारला लिंक करण्याची मुदत वाढवली; देशभरात कुठेही मिळणार रेशन

सरकारने यापूर्वी जाहीर केले होतं की ही रेशन कार्ड आणि आधार कार्ड ३१ मार्चपर्यंत एकमेकांशी लिंक करणं आवश्यक होतं.
Ration Card
Ration CardSaam TV

नवी दिल्ली : देशातील रेशनकार्ड धारकांनी फेब्रुवारीपर्यंत ९६ टक्के लाभार्थ्यांनी एक राष्ट्र-एक रेशन कार्ड (One Nation-One Ration card) योजनेत स्वतःचा समावेश केला आहे. या योजनेमध्ये अनेक राज्यांमध्ये नावनोंदणीचे काम सुरू असून ते काम अजून पुर्ण न झाल्याने सरकारने दिलेली ३१ मार्च ही अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

गावखेड्यांमध्ये असो वा शहरांमध्ये सरकारद्वारे दिले जाणारे स्वस्त धान्य घेण्यासाठी आपणाला आपले रेशन कार्ड त्या रेशन दुकानावरती (Ration Shop) घेऊन जावे लागते. त्यासाठी ते अत्यंत उपयोगी आहे. तसंच आता कोरोना काळात देखील मोदी सरकारने मोफत रेशन देण्याची योजना सुरु केली होती तेंव्हापासून अनेक नागरिकांना आपल्या रेशनकार्डचं महत्व जाणवू लागलं आहे. त्यामुळे अजुनही रेशन कार्ड-आधार कार्डला (Aadhar Card) लिंक केलेलं नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की सरकारने ही दोन्ही कागदपत्रे लिंक करण्यासाठीची मुदत वाढवून दिली आहे.

सरकारने यापूर्वी जाहीर केले होतं की ही रेशन कार्ड आणि आधार कार्ड ३१ मार्चपर्यंत एकमेकांशी लिंक करणं आवश्यक होतं. मात्र आता याबाबतची मुदत वाढवली असून ती आता सरकारने जाहीर केलेल्या निवेदनानुसार ती आता काम ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

देशात कुठेही मिळणार रेशन -

सरकारकडून रेशनकार्ड वन नेशन-वन रेशन कार्ड (One Nation-One Ration card) म्हणून जाहीर करण्यात आले आहे तेंव्हापासून ते आधार कार्डला जोडण्यासाठी महत्व देण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (National Food Security Act) एखाद्या व्यक्तीचं रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल, तर त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन कोणत्याही दुकानातून रेशन धान्य मिळू शकतं.

पहा व्हिडीओ -

देशात केवळ एकच शिधापत्रिका नियमित करणे हा या योजनेचा उद्देश असून रेशनकार्ड एकदा आधारशी लिंक झाले तर हे रेशनकार्ड कुठेही वैध असेल, तसंच भ्रष्टाचाराला यामध्ये वाव असणार नाही. यासाठी वन नेशन-वन रेशन कार्ड योजनेचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.

या योजनेत आतापर्यंत ८० कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांपैकी ९६ टक्के नागरिकांनी एक राष्ट्र-एक रेशन कार्ड योजनेमध्ये स्वतःचा समावेश केला असून सध्या अनेक राज्यांमध्ये नावनोंदणीचे काम सुरू ते काम अजून पुर्ण न झाल्याने सरकारने ३१ मार्च ही अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपली कार्ड लिंक केली नाहीत त्यांनी या वाढविलेल्या मुदतीचा फायदा घेत लवकर कार्ड लिंक करावी असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com