Omicron नंतर आता Delmicron चा धोका? वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा !

आता आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. नवीन रूपाचे नाव (Delmicron) असे आहे. काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांमागे Delmicron प्रकार जबाबदार असल्याचे मानले जात आहे.
Omicron नंतर आता Delmicron चा धोका? वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा !
Omicron नंतर आता Delmicron चा धोका? वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा !SaamTV
Published On

डेलमिक्रॉन : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार यूके, अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पसरत आहे. कोरोनाच्या आधी डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) चा उद्रेक झाला होता. परंतु असे असतानाच आता आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. नवीन रूपाचे नाव (Delmicron) असे आहे. काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांमागे Delmicron प्रकार जबाबदार असल्याचे मानले जात आहे.

डेलमिक्रॉन हा प्रकार डेल्टा आणि ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरतो, असा दावा केला जात आहे. यामुळे, डेल्टा पेक्षा सौम्य लक्षणे दिसली तरी लोकांमध्ये संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. डेल्मिक्रोनचे कोणतेही प्रकरण भारतात अद्याप आढळून आले नाही. तसेच या व्हेरियंटबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही. त्यामुळे त्याच्या लक्षणांबद्दल अधिकृतपणे काही माहिती समोर आलेली नाही.

Omicron नंतर आता Delmicron चा धोका? वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा !
युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्ह्याध्यक्षांचा विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

भारतात गेल्या 24 तासांत 'ओमिक्रॉन' या कोरोना विषाणूचे 122 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील एकूण रुग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. यापैकी 114 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. ही प्रकरणे 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदवली गेली आहेत. सर्वाधिक संख्या दिल्लीत (67) आहे. त्यानंतर तेलंगणात 38, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटकात 31 आणि गुजरातमध्ये 30 आहेत. त्याचवेळी, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 6,650 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 3 कोटी 47 लाख 72 हजार 626 वर पोहोचली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 चे टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या शशांक जोशी यांनी, “डेलमिक्रॉन या डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या एकत्र संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. ओमिक्रॉन पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढलून आलेला आहे . आतापर्यंत ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव तब्बल 89 देशांमध्ये झालाय.

हे देखील पहा-

डेलमिक्रॉन हा करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट नाही आहे, परंतु यामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या स्ट्रेनचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. कोरोना रुग्णांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉनचा व्हेरियंटचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव वाढत चालला आहे असं दिसून येत आहे. तर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशनने (Center for Disease Control and Prevention) दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावापैकी 99.5 टक्के प्रकरण ही अमेरिकेशी संबंधित आहेत.

याबद्दल डॉक्टरांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांमध्ये तासेच, वयस्कर व्यक्ती आणि गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते. कमी लसीकरण झालेल्या भागांमध्ये हे दोन्ही व्हेरिएंट फार वेगाने प्रादुर्भाव करु शकतात असेही सांगण्यात येत आहे. मात्र, दोन्ही व्हेरिएंट एकत्र येऊन एक सुपर स्ट्रेन तयार होऊ शकतो की नाही यावरुन तज्ज्ञांमध्येच मत आहेत. काही संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अशाप्रकारे एकाच वेळी दोन व्हेरिएंट सक्रीय असले तरी ते एकत्र येऊन नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. मात्र, ही शक्यता पूर्णपणे फेटाळताही येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com