Crime News: ऐन होळीत तिच्या आयुष्याची राखरांगोळी! डॉक्टर तरुणीची प्रियकरानेच केली निर्घृण हत्या; आधी चाकूने भोकसले अन्...

जम्मूत रक्ताची होळी! काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या भीषण हत्येने देशभरात खळबळ माजली आहे....
 Crime News
Crime News

Jammu Sumedha Sharma Case: देशात प्रेमप्रकरणातून मुलींच्या हत्येच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या श्रद्धा वायकर प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या हत्या प्रकरणातील झालेल्या खुलाश्याने देशभरात संतापाची लाट पसरली होती. हे प्रकरण चर्चेत असतानाच जम्मू- काश्मिरमधू अशीच एका भीषण हत्येची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

 Crime News
Kirit Somaiya: अनिल परब आक्रमक! किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ? 'नाहक बदनामी झाल्याचे सांगत थेट...'

प्रेमप्रकरणातून झाली हत्या...

याबाबत अधिक माहिती अशी की, जम्मूमध्ये दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. काश्मिरमध्ये एका महिला डॉक्टरला तिच्या प्रियकराने चाकूने भोसकून मारून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या करणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीच्या खुनानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुमेधा शर्मा (Sumedha Sharma) असे या हत्या तरुणीचे नाव आहे. तर तिच्या वडिलांचं नाव कमल किशोर शर्मा (Kishor Sharma) असं आहे. सुमेधा ही तालाबा तिल्लो (जम्मू) येथील रहिवासी होती. तर तिचा खून करणारा आरोपी हा डोडा जिल्ह्यातील भद्रवाह गावचा रहिवासी असून त्याचं नाव जौहर गनई असं आहे. त्याच्या वडिलांचं नाव महमूद गनई असं सांगण्यात येत आहे. त्याचं कुटुंब सध्या पंपोश कॉलोनी येथे राहात आहे.

 Crime News
Manish Sisodia News: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया अडचणीत! १७ मार्चपर्यंत इडी कोठडीत रवानगी

स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न...

मृत सुमेधा शर्मा आणि आरोपी जौहर एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांनी जम्मूमधल्या दंत महाविद्यालयातून बीडीएसचं शिक्षण पूर्ण केले होते. सुमेधा सध्या जम्मू-काश्मीरच्या बाहेर असलेल्या एका कॉलेजमध्ये एमडीएसची तयारी करत होती. होळीनिमित्त ती तिच्या घरी आली होती.

गावी आल्यानंतर ७ मार्च रोजी ती तिचा बॉयफ्रेंड जौहरला भेटायला जानीपूर येथे गेली. तिथे दोघांमध्ये भांडण झालं. यावेळी जौहरने किचनमधील चाकूने भोसकून सुमेधाची हत्या केली. त्यानंतर त्याच चाकूने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी तो जखमी झाला.

 Crime News
Sushma Andhare: आजही माझ्या घरावर कमळ कोरलेलं; सुषमा अंधारे सांगितले कमळासोबतचं नातं

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तिथे डॉक्टर सुमेधाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळला. तर आरोपी जौहरच्या शरीरावर जखमेच्या खुना होत्या. यानंतर पोलिसांनी जखमी जौहरला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com