Covid: कोरोनाचा 'हा' व्हेरियंट डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक!

कोरोनाच्या विषाणूच्या सुपर व्हेरिएंट बद्दल स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली आहे की हा विषाणू येत्या काळात येऊ शकतो.
Covid: कोरोनाचा 'हा' व्हेरियंट डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक!
Covid: कोरोनाचा 'हा' व्हेरियंट डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक!Saam Tv
Published On

कोरोनाच्या विषाणूच्या सुपर व्हेरिएंट Super Variant बद्दल स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली आहे की हा विषाणू येत्या काळात येऊ शकतो. जी एक नवीन धोक्याची घंटा असू शकते. याबद्दल अधिक धोकादायक गोष्ट अशी आहे की, नवीन सुपर व्हेरिएंट स्वतःमध्ये सर्व म्युटेशन्स समाविष्ट करू शकतो. स्वित्झर्लंडमधील बासेल येथील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे इम्युनोलॉजिस्ट डॉ. साई रेड्डी म्हणाले आहेत की, सुपर व्हेरिएंट चा धोका टाळण्यासाठी अधिक प्रभावी आणि सुरक्षित लस बनवावी लागेल.

हे देखील पहा -

हा कोविड -22 अधिक प्राणघातक असू शकतो. डॉ. रेड्डी म्हणाले की, कोरोना कधी संपेल, हे अद्याप माहित नाही. अशा परिस्थितीत, कोविड -19 देखील कोविड -22 बनू शकते जे अधिक प्राणघातक असू शकते. डॉ रेड्डी स्पष्ट करतात की सुपर व्हेरिएंट आला तर सर्व लोक धोक्यात येतील, हा व्हायरस रोग प्रतिकारशक्ती तोडण्यासाठीच स्वतःला तयार करेल.

Covid: कोरोनाचा 'हा' व्हेरियंट डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक!
औरंगाबाद विद्यापीठाचा निर्णय; पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत संपूर्ण फी माफ

एका अहवालानुसार, साई रेड्डी यांनी इशारा दिला आहे की, 2022 मध्ये कोविडचे नवीन रूप येऊ शकते. Covid -22 हे नाव किंवा हा शब्द सर्वप्रथम स्वित्झर्लंडच्या ETH ज्यूरिख येथील Systems and Synthetic Immunologyचे सहयोगी प्राध्यापक साई रेड्डी यांनी वापरला आहे. यासह, त्यांनी असेही म्हटले की, जर एखादी व्यक्ती, ज्याला लस मिळाली नाही आणि त्याच्या संपर्कात आली, तर तो सुपर स्प्रेडर बनू शकतो.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com