Covid 19 : सावधान! तो पुन्हा येतोय... आशियाई देशात कोरोनाचे थैमान, भारतात ही अलर्ट?

Corona News : कोरोनाच थैमान भारतासह जगानं अनुभवलय. त्यात आता तो पुन्हा येतोय! होय तुम्ही ऐकताय, ते खरंय. आशियाई देशात कोरोना झपाट्यानं पसरतोय. त्यामुळे आता पुढं काय होणार. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Covid 19
Covid 19Saam Tv
Published On

मिताली मठकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

2020 मध्ये संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा धडक दिली आहे. आशियाई देशांमध्ये त्याची एन्ट्री झाली आहे, कोरोना व्हायरसचे रुग्ण आशियातील अनेक देशांमध्ये अचानक वाढू लागले आहेत. चीन-हाँगकाँग आणि सिंगापूर-थायलंडमध्ये कोरोना व्हायरसने हातपाय पसरले असून फक्त हाँगकाँगमध्येच आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे.या देशांमध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे पाहूया

आशियाई देशात कोरोनाचे थैमान

- हाँगकाँगमध्ये कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 31 पर्यंत गेली आहे

- सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येत 28 टक्के वाढ झाली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसर्गित रुग्णांची संख्या 14,200 च्या पुढे गेली आहे.

- याच कालावधीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही 30 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

- चीनमध्ये 4 मे पर्यंत रुग्णालयांमधील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

- थायलंडमध्ये एप्रिल 2025 मध्ये झालेल्या सॉन्गक्रान उत्सवानंतर संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत.

Covid 19
Beed News : एसटी गुन्हेगारीचा अड्डा बनली, महिलांची छेड काढली, नंतर नातेवाईकांनी बस फोडली

आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, भारतालाही असा धोका आहे का? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार, भारतात आतापर्यंत केवळ 93 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाचा झपाट्यानं होणारा संसर्ग बघता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचे कारण नसले तरी योग्य खबरदारी घेणं मात्र आवश्यक आहे.

Covid 19
Beed Crime : तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू...! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, परळीत मारहाण झालेल्या तरुणाने सांगितली आपबिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com