धार्मिक कार्यक्रमात कपलचा रोमान्स लाईव्ह; ४५ मिनिटापर्यंत सुरु होता प्रकार

'त्या' कपलला जेव्हा समजले तेव्हा ४५ मिनिट होऊन गेले होते.
Couple Romance
Couple RomanceSaam Tv
Published On

वाशिंग्टन : गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोना (Corona) महामारीमुळे ऑनलाइन मीटिंगचा ट्रेंड वाढला आहे. सगळ्याच कार्यालयामध्ये व्हर्च्युअल मीटिंग घेतल्या जात आहेत. काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, पण तरीही ऑनलाइन (Online) पध्दतीने मीटिंग सुरुच आहेत. या मीटिंग झूम कॉल, गुगल मीटवरुन घेतल्या जातात. ऑनलाइन मीटिंग सुरु असताना अनेकांच्या चुका होत असतात. अशाच एका ऑनलाइन धार्मिक कार्यक्रमादरम्यान एका जोडप्याची चूक झाल्याची समोर आले आहे. झूमवरुन ऑनलाइन कार्यक्रम सुरु असताना एका जोडप्याचे रोमान्स (Romance) सुरु असल्याचे समोर आले आहे.

Couple Romance
Vladimir Putin Death | व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू? त्यांच्या जागी बहुरुपी?

ही घटना अमेरिकेतील मिनियापोलिस मधील आहे. या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन केले होते. हा कार्यक्रम झूम कॉलवरुन सुरु होता. यात अनेक लोकांनी सहभाग घेतला होता. सर्वांचे कॅमेरे सुरु होते. तसंच या जोडप्याचाही कॅमेरा सुरु होता. पण त्यांचा स्पीकर बंद होता. पण, त्यामुळे या जोडप्याला वाटले आपला कॅमेरा बंद आहे, ही चूक या जोडप्याला महागात पडली आहे.

कार्यक्रम ऑनलाइन सुरु होता. झूमद्वारो (Zoom) धार्मिक कार्यक्रम सुरु होता. यावेळी या जोडप्याने रोमान्स सुरु केला. या जोडप्याला वाटले आपला कॅमेरा बंद आहे. यावेळी त्यांना काही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या जोडप्याने ऐकले, नाही. शेवटी एका व्यक्तीने त्या जोडप्याला वैयक्तीक मेसेज पाठवला. यावेळी त्या जोडप्याच्या ही बाब लक्षात आली. पण या गोष्टीला ४५ मिनीट होऊन गेली होती. ऑनलाइन धार्मिक कार्यक्रमादरम्यान या जोडप्याचा ४५ मिनीट रोमान्स सुरु होता.

Couple Romance
'होय... मी गांजा ओढत होतो'; आर्यन खानची एनसीबी समोर कबुली

ही घटना अमेरिकेतील मिनियापोलिस येथील आहे. या जोडप्याची ओळख उघड झालेली नाही. व्हिडिओमध्ये (Video) कपल रूममध्ये विवस्त्र होऊन रोमान्स करताना दिसत आहे. झूम कॉल दरम्यान जोडपे अशा अवस्थेत दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. याअगोदरही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाइन मीटिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोक व्हर्च्युअल मीटिंगवर अधिक भर देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com