Ban On Cabbage Manchurian: कॉटन कॅण्डी आणि कोबी मंचुरियनवर बंदी; काय आहे कारण? जाणून घ्या

Karnataka News : कर्नाटक सरकारने कॉटन कॅण्डी आणि कोबी मंचुरियनवर बंदी घातली आहे. त्यामधील रोडामाईन बी घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याने येथील सरकारने या पदार्थावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.
 Cabbage Manchurian
Cabbage ManchurianSaam Tv
Published On

Ban On Cotton candy And Cabbage Manchurian In Karnataka:

बाजारात मिळणाऱ्या काही खाद्य पदार्थांमध्ये फुड कलर्स आणि प्रिझर्वेटिव्सचा वापर केला जातो. याचा वापर केल्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आरोग्य तज्ज्ञांचा माहितीनुसार, फुड कलर्स आणि प्रिझर्वेटिव्समुळे मेटाबॉलिज्म आणि कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या गोष्टीची बाब लक्षात घेत कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.(Latest News)

आज सोमवारी कर्नाटकमध्ये कॉटन कॅण्डी आणि कोबी मंचुरियन बनवण्यासाठी वापरले जाणाऱ्या फुड कलर आणि प्रिझर्वेटिव्सवर बंदी घालण्यात आली आहे. कोबी मंच्युरियन आणि कॉटन कॅण्डीमध्ये रोडामाईन बी या कलरिंग घटकाचा वापर केला जातो. हे कलरिंग घटक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. पदार्थांमधील फूड कलर्समुळे आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात, हे लक्षात घेत कर्नाटक सरकारने (Karnataka Government) यावर बंदी घालण्याचे संदेश दिले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारकडून काढलेल्या आदेशानुसार, जर कोणी हॉटेल व्यवसायिक कोणत्याही पदार्थांमध्ये कलरिंग घटकचा वापर करत असेल किंवा आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल. हानिकारक फुड कलर्सचा उपयोग केल्यास त्या व्यक्तीवर खाद्य सुरक्षा अधिनियम यांच्याकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी दिली. यापूर्वी पद्दुचेरी आणि तमिळनाडू येथेही कॉटन कॅण्डीवर बंदी घालण्यात आली होती.

वृत्तानुसार, रोडामाईन बीचा प्लास्टिक आणि पेपर रंगवण्यासाठी वापर केला जातो. हे घटकाचा वापर कोबी मंचुरियन बनवण्यासाठी केला जातो. परंतु हे घटक आरोग्यास हानिकारक आहेत. रोडामाईन बी हे घटक मानवी शरीरात गेल्यास कर्करोग होण्याची शक्यता असते. अन्न सुरक्षा विभागाकडून गुलाबी, हिरवी आणि जांभळ्या रंगाची कॉटन कॅंडी खाणे टाळावे. कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात रोडामाईन बी या रसायनाचा वापर केला जातो. याच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका वाढत असतो.

रोडामाईन बीमुळे शरीरात होणारे परिणाम :

रोडामाईन बी या घटकाचा उपयोग लेदर कलरिंग आणि पेपरप्रिंटिंगसाठी केला जातो. या पदार्थाचा खाद्यपदार्थात वापर केल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. हे घटक मानवी शरिरात गेल्यास अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. रोडामाइन बी खरंतर फॅब्रिक, कार्पेट आणि प्लास्टिक यासारख्या उद्योगांमध्ये वापरला जातो.

 Cabbage Manchurian
Health Tips : सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय आहे? जाणून घ्या फायदे आणि तोटे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com