Coronavirus latest update: कोरोनानं चीनमध्ये धुमाकूळ घातलाय. त्या पार्श्वभूमीवर भारतात काळजी घेतली जात आहे. सरकारने आवश्यक ती पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतासाठी पुढचे 40 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. (Corona Vaccine)
ओमिक्रॉन सब व्हेरिएंट BF.7 आला तर, कोरोना केसेस अचानक वाढू शकतात. याशिवाय नाकाद्वारे दिली जाणारी लस बाजारात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. तसेच यावेळी मास्क घालणे अनिवार्य केले जाण्याची शक्यता देखील कमी आहे. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता कमी आहे, परंतु रुग्णांची संख्या जास्त असू शकते.
जानेवारी महिना महत्वाचा का?
गेल्या दोन दिवसांत विमानतळांवर 6000 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून 32 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या विमानतळावर जाणार आहेत. याआधीचे ट्रेंड पाहिले तर दिसून येतं की पूर्व आशियापासून सुरुवात केल्यानंतर, व्हायरस भारतात पोहोचण्यास 30 ते 35 दिवस लागतात. त्यानुसार जानेवारी महिना महत्त्वाचा आहे. (Latest Marathi News)
देशातील कोरोनाची सद्यस्थिती
कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.8% आहे. गेल्या 24 तासात 141 रुग्ण बरे झाले आहेत तर गेल्या 24 तासात 188 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात 3,468 कोविड रुग्ण उपचाराधीन आहे. गेल्या 24 तासात 1,34,995 चाचण्या करण्यात आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.