कोरोनानं टेन्शन वाढवलं! देशात सलग दुसऱ्या दिवशी आढळली मोठी रुग्णसंख्या; १४ मृत्यू

आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 7,985 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
Corona Virus latest News
Corona Virus latest NewsSaam Tv

नवी दिल्ली: देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत भारतात 12 हजार 847 नवीन (corona new patients) कोरोना रुग्ण आढळले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात असताना दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. (Corona Virus Latest News in India)

Corona Virus latest News
SSC Result: यंदाही कोकणची कमाल, नाशिक विभाग शेवटून पहिला; असा आहे विभागनिहाय निकाल

आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 7,985 रुग्ण कोरोनामुक्त झाले. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 63,063 झाली आहे. त्याच वेळी, दैनिक सकारात्मकता दर 2.47% पर्यंत वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून भारतात 4 कोटी 32 लाख 70 हजार 577 बाधित झाले आहेत. यापैकी 4 कोटी 26 लाख 82 हजार 697 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

याशिवाय देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 817 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लसीकरणही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एकूण 1,95,84,03,471 लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, गुरूवारी देशात कोरोना संसर्गाची 12,213 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून, हा आकडा दररोज 8000 च्या जवळपास होता. मात्र दोन दिवसांत त्यात मोठी वाढ झाली. सध्या कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर 2.38 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.21 टक्के आहे.

Corona Virus latest News
कच्चा तेलाच्या दरात पुन्हा घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 4255 नवे रुग्ण आढळले असून केरळमध्ये 3419 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कर्नाटकात 833 आणि हरियाणामध्ये 625 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात कोरोना बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या भारतात कोरोना रिकव्हरी रेट 98.65 टक्के आहे. महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोना संसर्गाचा वाढता वेग हा चिंतेचा विषय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन्ही राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्राने ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यांना चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण या धोरणावर काम करण्याचा सल्ला दिला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com