मास्क नसेल तर विमान प्रवास करू दिला जाणार नाही; काय आहेत नवीन गाइडलाइन्स?

मास्क नसेल तर विमान प्रवास करू दिला जाणार नाही. डीजीसीएने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
Coronavirus Travel Update News In Marathi
Coronavirus Travel Update News In MarathiSAAM TV

नवी दिल्ली: तु्म्ही नियमित विमान प्रवास करत असाल तर, सतर्क व्हा! कारण आता तोंडावर मास्क लावला नसेल तर, विमानतळावर (Airport) प्रवेश करण्यापासून रोखण्यात येईल. तसेच विमान प्रवास करू दिला जाणार नाही. नागरी उड्डाण संचालनालयानं (DGCA) विमानतळ आणि विमान प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Coronavirus Travel Update News In Marathi
Maharashtra Corona: धोक्याची घंटा! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांत दुपटीने वाढ

नव्या नियमांनुसार, विमानतळ आणि विमान प्रवासादरम्यान मास्कसंबंधी नियमांत कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. मागील आठवड्यात हायकोर्टानं फटकारल्यानं डीजीसीएने नवीन मार्गदर्शक सूचना (Guidelines) प्रसिद्ध केल्या आहेत.

डीजीसीएने बुधवारी सांगितले की, 'विमानतळे आणि विमान प्रवासादरम्यान मास्क लावला नसेल तर, ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल. त्याचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना विमानतळांवरूनच परत पाठवले जाईल.' एखाद्या प्रवाशाने मास्क लावण्यास वारंवार नकार दिला आणि कोविड नियमांचे पालन केले नाही तर, त्यांना उड्डाणापूर्वीच विमानातून उतरवण्यात येईल, असेही डीजीसीएने म्हटले आहे.

Coronavirus Travel Update News In Marathi
Mumbai Corona Update : मुंबईकरांनो सावधान! आजची कोरोना आकडेवारी धास्ती वाढवणारी

डीजीसीएच्या माहितीनुसार, नियमांचे पालन (Covid Rules) न झाल्यास करण्यात येणाऱ्या कारवाई अंतर्गत संबंधित प्रवाशांना सीआयएसएफच्या ताब्यात दिले जाईल. तसेच संबंधित प्रवाशांना दंडही आकारला जाईल. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर विमानतळे आणि विमानांमध्ये प्रवासादरम्यान मास्क वापरण्यासंबंधी नियमांत शिथिलता देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा विमानतळे आणि विमानात प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com