कोरोनानंतर आणखी एका संसर्गजन्य रोगाचे संकट

कोरोना महामारीच्या संकट असतानाच अमेरिकामध्ये लाइलाज कँडिडा ऑरिस हा संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव आता वाढला आहे.
कोरोनानंतर आणखी एका संसर्गजन्य रोगाचे संकट
कोरोनानंतर आणखी एका संसर्गजन्य रोगाचे संकट Saam Tv
Published On

अमेरिका : कोरोना Corona महामारीच्या संकट असतानाच अमेरिकामध्ये America लाइलाज कँडिडा ऑरिस Candida Orissa हा संसर्गजन्य infectious आजाराचा प्रादुर्भाव आता वाढला आहे. कॅंडिडा ऑरिस हा फंगस Fungus माणसाच्या मृत्यू नंतर देखील नष्ट होत नाही आणि एका शरीरातून तो दुसऱ्या शरीरात वेगाने पसरत आहे. कँडिडा ऑरिस या आजाराचे रुग्ण सापडल्याची माहिती डलास Dallas या ठिकाणी २ रुग्णालये Hospitals आणि वॉशिंगनट Washington DC डीसी मधील १ नर्सिंग होम मधून देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

कँडिडा ऑरिस या संसर्गजन्य रोगाच्या रुग्णावर उपचार सुरु आहे. रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्या रुग्णांना या आजारापासून मोठ्या प्रमाणात धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर रोगांच्या पेक्षा हा आजार जास्त घातक व संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी सांगितले आहे. वॉशिंगटन डीसी नर्सिंग होम मध्ये कँडिडा ऑरिस या रोगाच्या १०१ रुग्णाची नोदं करण्यात आली आहे.

या मध्ये ३ रुग्णांवर कुठल्याही प्रकारच्या अँटीफंगल औषधांचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. डलास या ठिकाणी २ रुग्णालयात २२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामधील २ रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा आजार एका रुग्णांपासून दुसऱ्या रुग्णाकडे पसरत असल्याचा निष्कर्ष आणि माहिती CDC ने सांगितले आहे.

कोरोनानंतर आणखी एका संसर्गजन्य रोगाचे संकट
चीनमध्ये आणखी एका भयानक व्हायरसचा जन्म, लक्षणंच दिसत नसल्यानं रुग्ण ओळखण्याचं आव्हान

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीव्हेंशन CDC यांच्या अभ्यास व निष्कर्षानुसार कँडिडा ऑरिसच्या ३ रुग्णांमध्ये एकापेक्षा जास्त रुग्णाचा मृत्यू झाले होते. या संसर्गजन्य आजाराचा मृत्यूदर हा जास्त प्रमाणात आहे. सीडीसीने कँडिडा ऑरिस या संसर्गजन्य आजाराला जागतिक धोका समजले जात आहे. कोरोना विषाणूपेक्षा हा आजार अधिक धोकादायक असल्याचे देखील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कँडिडा ऑरिस फंगस हा आजार खूप धोकादायक आहे. यावर अॅन्टीफंगल मेडिकेशनचाही परिणाम जाणवत नाही. या फंगसवर आतापर्यंत कोणतेही औषध बनवण्यात आलेले नाही. या आजाराबाबत गोपनीयता ठेवण्यात आल्याने लोकांमध्ये फंगस विषयी कोणतीही माहिती नसल्याने सर्वात मोठी समस्या ठरली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com