आर्यन खानला अटक झालेली कॉर्डेलिया क्रूझ पुन्हा चर्चेत, क्रू स्टाफला कोरोना, 2000 प्रवासी अडकले

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कॉर्डेलिया क्रूझ जहाजातून 2000 हजार लोकांना गोव्याला घेऊन जाणाऱ्या या जहाजाच्या क्रू स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे.
कॉर्डेलिया क्रूझ
कॉर्डेलिया क्रूझ Saam Tv
Published On

गोवा : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज केसमध्ये ज्या कॉर्डेलिया क्रूझवरुन (Cordelia Cruise) अटक करण्यात आली होती. ती कॉर्डेलिया क्रूझ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कॉर्डेलिया क्रूझ जहाजातून 2000 हजार लोकांना गोव्याला घेऊन जाणाऱ्या या जहाजाच्या क्रू स्टाफला कोरोनाची (Corona) लागण झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या क्रूझवर झालेल्या कोव्हिड चाचणीत क्रू स्टाफ पॉझिटीव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. (Cordelia cruise crew member found positive for corona who are going Mumbai to Goa with 2000 passengers)

हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, क्रूझमधील 2,000 हून अधिक प्रवाशांची आणि संपूर्ण स्टाफची तपासणी केली जात आहे. जहाजावरील कोव्हिड (Corona Virus) संक्रमित क्रू मेंबरला सध्या वेगळे करण्यात आले आहे. तर, आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी कोणालाही जहाजातून उतरण्याची परवानगी नाही, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहे.

हेही वाचा -

कॉर्डेलिया क्रूझ
मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा सिलसिला सुरूच; ८,०६३ नवे रुग्ण

ही क्रूझ सध्या मुरगाव पोर्ट क्रूझ टर्मिनलजवळ आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने गोव्यात ही क्रूझ उभी करण्यास परवानगी दिलेली नाही. क्रू मेंबर अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहे. मात्र, आतापर्यंत फक्त एका क्रू स्टाफला संसर्ग झाल्याचे आढळून आले असून, बाकी सर्वांच्या कोरोना चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे.

महाराष्ट्रात 11,877 नवीन रुग्ण

रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 11,877 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही शनिवारच्या तुलनेत 2,707 अधिक आहे आणि तर ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 1,41,542 वर पोहोचली आहे. आता महाराष्ट्रात 42,024 सक्रिय रुग्ण आहेत. संसर्गाच्या 11,877 प्रकरणांपैकी मुंबईत 7,792 रुग्ण आढळले आहेत.

तर मुंबईत (Mumbai) कोरोनाचे 8,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई विभागात संसर्गाची 10,394 प्रकरणे होती, जी राज्यातील एकूण रुग्णांपैकी 90 टक्के आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com