'मोदी तुम्हारी कब्र खुदेगी, आज नही तो...'; काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचे संसदेत पडसाद , VIDEO

Modi Teri Kabr Khudegi: राहुल गांधींच्या रॅलीऐवजी दिल्लीत मोदींविषयी वादग्रस्त घोषणा देणाऱ्यांची चर्चा रंगलीय... मात्र मोदींबद्दल कोणत्या वादग्रस्त घोषणा देण्यात आल्या आहेत... त्याचे संसदेत कसे पडसाद उमटलेत.... आणि काँग्रेसनं त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय..
Modi slogan controversy at Rahul Gandhi rally
Modi slogan controversy at Rahul Gandhi rallySaam Tv
Published On

राहुल गांधींच्या व्होट चोरीविरोधातील रॅलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा... राहुल गांधींनी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर व्होटचोरीच्या मुद्दावर रॅली आणि सभेचं आयोजन केलं होतं. मात्र अतिउत्साही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोदींविरोधातल्या घोषणाबाजीमुळे मूळ मुद्दाच भरकटला... आणि सत्ताधारी भाजपाला राहुल गांधींना घेरण्यासाठी आयतं कोलीत मिळालं...या रॅलीतील घोषणांचे संसदेत तीव्र पडसाद उमटलेत... तर काँग्रेसनं मात्र घोषणाबाजीच्या मुद्द्यावर हात झटकलेत...

खरंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदा, संसद आणि रस्त्यावर उतरुन व्होट चोरीचे पुरावे देत आयोगाची पोलखोल केली...तर ही सत्य आणि असत्यामधील लढाई असल्याचं सांगत रामलीला मैदानावरुन मोदी आणि शाहांवर हल्लाबोल केला...

देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारे घोषणा देणं योग्य नाही... मात्र विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या राहुल गांधींबद्दलही भाजपच्या नेत्यांनीही टोकाची वक्तव्य केल्याचा पूर्वइतिहास आहे.

खासदार अनिल बोंडेंचं राहुल गांधींची जीभ छाटण्याबाबत वक्तव्य

जालन्याचे भाजप पदाधिकारी तरविंदर सिंह मारवांची राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी

केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांचं गांधींना गोळ्या घालण्याबाबत वक्तव्य

सत्ताधारी असो वा विरोधक.... वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना वेळीच रोखायला हवं... अन्यथा आधीच रसातळाला चाललेली देशाची राजकीय संस्कृती द्वेषाच्या राजकारणामुळे धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही... एवढंच नाही तर काँग्रेसनेही द्वेषाची फॅक्टरी खोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरायला हवं..कारण अशा कार्यकर्त्यांमुळे मूळ विषय बाजूला राहतोय... आता काँग्रेस कार्यकर्त्यांना काय आदेश देणार...याकडे देशाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com