Goa Exit Poll: गोव्यात त्रिशंकू परिस्थिती, भाजपपेक्षा काँग्रेसला मिळणार जास्त जागा

गोवा भाजपचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांच्याकडे पाहीलं जायचं त्या मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रीकरांची उमेदवारी भाजपने नाकारली आणि त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत बंडखोरी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.
Goa Exit Poll
Goa Exit PollSaam TV

मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचं मतदान पार पडलं असून आता फक्त सर्वांना निकालाची आतुरता लागली आहे. यासाठीत आज साम टिव्हीने जो सर्वे केला आहे त्यानुसार बऱ्यापैकी पाच राज्यातील निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय या संदर्भातील एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आला आहे.

सामच्या एक्झिट पोलनुसार पाच राज्यांपैकी सर्व पक्षांच लक्ष असणार आणि सर्वांसाठी महत्वाच मात्र सर्वांत छोट राज्य असणाऱ्या गोव्यातील (Goa) जनतेनं कोणाला कौल दिला आहे हे जाणून घेणार आहोत.

गोवा (Goa Election 2022) विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचे कारण प्रत्येक वेळी गोव्यातील लढत फक्त काँग्रेस-भाजपमध्ये असायची मात्र यावेळी शिवसेनेसह (Shivsena) आप (AAP) आणि तृणमूल काँग्रेसने (TMC) देखील गोव्याच्या निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली होती. आणि याच तीन पक्षांच्या येण्याने गोव्यात यंदा काय होणार याची सर्व देशातील जनतेला उत्सुकता आहे.

पहा व्हिडीओ -

मात्र या निवडणुकीचा निकाल काय असेल याकडे आतुरतेने आणि तेव्हढ्याच काळजीने भाजप नजरा लावून बसलं आहे. कारण गोवा भाजपचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांच्याकडे पाहीलं जायचं त्या मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रीकरांची (Utpal Parrikar) उमेदवारी भाजपने नाकारली आणि त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत बंडखोरी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. केवळ 40 आमदारांची संख्या असलेल्या गोव्यात बहुमताचा आकडा हा 21 आहे. आम्ही 22 जागा जिंकणार असा दावा भाजपने केला होता तर मागच्या वेळी आम्ही दुर्लक्ष केलं मात्र यावेळी सत्ता आमचीच असणार असं काँग्रेसने म्हंटल आहे मात्र जनतेचा कौल पुढील प्रमाणे आहे.

सामच्या एक्झिट पोलनुसार भाजपला या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ४० पैकी भाजपच्या पदरी फक्त १३ ते १५ जागा येण्याची शक्यता आहे. तर याच वेळी काँग्रेसला मात्र जनतेनं आपलंस केल्याचं दिसून येत आहे त्यानुसार या निवडणुकीत काँग्रेसला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Goa Exit Poll
UP Exit Poll: उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणत्या पक्षाकडे? आतुरता संपवा, पहा सामचा एक्झिट पोल

तर यावळी नव्या जोशाने निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला देखील २ ते ३ जागा आणि आपला देखील तेवढ्याचं जागा मिळण्यची शक्यता असून इतर पक्षांना आणि अपक्षाना ७ जागा मिळण्याची शक्यता सामच्या Exit Poll नुसार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com