सोनाली शिंदे
हस्तीनापूर - महाभारतात कौरवांची राजधानी असलेलं हस्तीनापूर. मिस बिकनीच्या उमेदवारीमुळे सध्या चर्चेत आहे. उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) काँग्रेसने 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. काँग्रेसने (Congress) 27 वर्षीय अर्चना गौतमला हस्तीनापूर (Hastinapur) मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
हे देखील पहा -
मेरठमध्ये जन्मलेल्या अर्चनाने आपलं मॉडेलिंग आणि अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली होती. मॉडेलिंग करत असतानाच तिने 2014 ला मिस युपी किताब पटकावला. 2015 ला ग्रॅंड मस्ती सिनेमातून अर्चनाने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. 2018 ला ती मिस बिकनी इंडिया बनली, तसेच मिस बिकनी युनिवर्समध्येही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. अलीकडच्या हसीना पारकर, बरोट कंपनी या सिनेमांमध्ये ती होती.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत अर्चना गौतमने नोव्हेंबरमध्ये काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं आणि काँग्रेस प्रचाराला सुरुवात केली. या मतदारसंघात विद्यमान आमदार दिनेश खटीक हे भाजपमध्ये मंत्री आहेत. त्यांच्याविरोधात सपा-रालद आघाडीने गेल्यावेळी बसपातून लढलेल्या योगेश वर्मांना उमेदवारी देत तगडं आव्हान दिल आहे. अशा परिस्थितीत राजकारणाच्या रॅम्पवर चालण्यात बिकनी गर्ल कितपत यशस्वी होईल, हे उत्सुकतेचं राहील.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.