Rahul Gandhi : राहुल गांधींचा 'पवार पॅटर्न'; भर पावसात भाषण करत गाजवलं मैदान

राहुल गांधी यांचं भाषण सुरू होताच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, तरीही त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. या भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Rahul Gandhi Rain Speech :
Rahul Gandhi Rain Speech : Twitter
Published On

Rahul Gandhi Rain Speech : काँग्रेस नेते (Congress) आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. रविवारी राहुल गांधी यांनी येथील नंजनगुड येथील प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित केले. राहुल (Rahul Gandhi) यांचं भाषण सुरू होताच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, तरीही त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. या भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Rahul Gandhi News Today)

Rahul Gandhi Rain Speech :
Uttar Pradesh: भदोहीमध्ये दुर्गापूजा मंडपाला आग; 3 जणांचा मृत्यू, 64 जण होरपळले

पावसात राहुल गांधींनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शेअर करत आहेत. स्वत: राहुल गांधींनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे. 'आम्हाला भारताला एकत्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही.' असं म्हणत राहुल यांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय.

या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पावसाच्या दरम्यान राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भर पावसात सभेला उपस्थित राहिलात नागरिकांचे देखील आभार मानले. (Rahul Gandhi Latest News)

२०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे झालेल्या प्रचार सभेला संबोधित करत असताना मध्येच मोठा पाऊस आला. भर पावसांत शरद पवार हे सभेला संबोधित करत राहिले. यावेळी त्यांनी छत्री घेण्यासही नकार दिला होता.

या सभेमुळे निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते. पवार यांनी या भाषणादरम्यान पडणाऱ्या पावसाला 'वरुण राजा'चा आशीर्वाद संबोधले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीत उदयन राजे यांचा पराभव झाला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com