Goa Elections 2022: मिशन गोव्यासाठी निवडणुक निकालाआधीच कॉंग्रेसकडून मोर्चेबांधणी

Goa Elections 2022: मागील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस (Congress) पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले, मात्र असं असूनही डावपेच खेळत भाजपने (BJP) सरकार स्थापने केले होते.
Congress is preparing for Mission Goa before election results
Congress is preparing for Mission Goa before election resultsSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

पणजी: येत्या १० मार्चला देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहिर होणार आहेत. यात गोवा राज्यात विधानसभा निवडणुकाच्या निकालाआधीच कॉंग्रेसनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचं कारण म्हणजे मागील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस (Congress) पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले, मात्र असं असूनही डावपेच खेळत भाजपने (BJP) सरकार स्थापने केले होते. या अनुभवावरून पुन्हा असं होऊ नये यासाठी काँग्रेस खबरदारी घेत आहे. मिशन गोवा (Gao) फत्ते करण्यासाठी कॉंग्रसेचे काही नेते गोव्याला जाणार आहेत. (Congress is preparing for Mission Goa before election results)

हे देखील पहा -

महाराष्ट्रातील काँग्रेसचे मंत्री सुनील केदार आणि सतेज पाटील यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोव्यातील कॉंग्रेस आमदारांची जबाबदारी या नेत्यांकडे दिली गेली असून निकालाच्या दिवशी हे नेते गोव्यात तळ ठोकून बसणार आहे.

गोव्याची सत्ता समीकरणे:

गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. गोव्यात विधानसभेच्या (Goa Assembly Elections 2022) ४० जागा आहेत. २०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रेसनं १७ तर भाजपनं १३ जागा जिंकल्या होत्या. तसेच महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष ३, गोवा फॉरवर्ड पक्ष ३, राष्ट्रवादी १ तर इतर ३ असा निकाल लागला होता. यात कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही कॉंग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. यावेळी मागच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसने ही निवडणुकांच्या निकालाआधीच मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com