डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्या एकत्रित; 29 अब्ज डॉलरचा व्यवहार

जगप्रसिद्ध असलेल्या डिजिटल पेमेंट क्षेत्रातल्या दोन महाबलाढ्य कंपन्या एकत्र येणार आहेत. अमेरिका मधील पेमेंट अॅप 'स्क्वेअर' ही कंपनी ऑस्ट्रेलियन जगप्रसिद्ध पेमेंट आप 'आफ्टरपे' कंपनीचा ताबा घेणार आहे.
डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्या एकत्रित; 29 अब्ज डॉलरचा व्यवहार
डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्या एकत्रित; 29 अब्ज डॉलरचा व्यवहारSaam Tv
Published On

न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध असलेल्या डीजिटल पेमेंट क्षेत्रातल्या दोन महाबलाढ्य कंपन्या एकत्र येणार आहेत. अमेरिका मधील पेमेंट अॅप 'स्क्वेअर' Square ही कंपनी ऑस्ट्रेलियन जगप्रसिद्ध पेमेंट आप 'आफ्टरपे' Afterpay कंपनीचा ताबा घेणार आहे. तब्बल २९ अब्ज डॉलर इतक्या मोठ्या किंमतीला हा व्यवहार झाला आहे. तर या व्यवहाराबाबत 'स्क्वेअर'कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जॅक डॉर्सी Jack Dorsey यांनी याची घोषणा केली आहे.

जॅक डॉर्सी यांनी स्पष्ट केले आहे की. स्केअर' आणि 'आफ्टरपे'चे ध्येय समान असून या पुढील वाटचाल ते एकत्रित करणार आहेत. बँकाच्या क्रेडीट कार्डला पर्याय देण्याची योजना 'स्केअर' कडून आखण्यात आली. हा व्यवहार सुद्धा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा-

'बाय नाऊ, पे लॅटर' Buy Now Pay Later नावाची ही सुविधा ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या 'आफ्टरपे' कडून ग्राहकांना देण्यात येते. त्यामुळे या कंपनीची सुविधा वापरणारे ग्राहक हे त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करु शकतात. नंतर इन्स्टॉलमेंटमध्ये त्याची किंमत देते येते. या एकत्रित येण्याच्या करारामुळे ही सेवा आता आफ्टरपेच्या अॅपवरही सुरु होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या लाखो ग्राहकांना आणि लहान उद्योगांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतील.

इंस्टॉलमेंट वर व्याज नाही - महत्वाचे म्हणजे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तुंच्या इन्स्टॉलमेंटवर कंपनीकडून कोणतेही व्याज सुद्धा आकारले जाणार नाही.

डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्या एकत्रित; 29 अब्ज डॉलरचा व्यवहार
युवा स्वाभिमान पक्षाचा महानगर पलिकेवर हल्लाबोल

सद्य सात कोटी पेक्षा जास्त ग्राहक ग्राहक हे स्केअर पेमेंट अॅपचे आहेत. ग्राहकांकडून कॅश-फ्री खरेदीसाठी कोरोना काळात या अ‍ॅप चा स्क्वेअर पेमेंट अ‍ॅप चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. तसेच आता या कंपनीकडून आता लहान उद्योगांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या आफ्टरपेचे जगभरात १.६० कोटी ग्राहक आहेत. तर जवळपास एक लाख लहान उद्योगही यामध्ये सामिल आहेत.

आफ्टरपेचे संस्थापक अॅन्थोनी आयसेन आणि निक मोलनार हे दोघेही आता आफ्टरपे आणि स्क्वेअरमध्ये झालेल्या या व्यवहारानुसार स्क्वेअरमध्ये सामिल होणार आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com