Yogi Adityanath : महिलेची छेड काढली टवाळखोरांनी, बदली बड्या अधिकाऱ्यांची अन् अख्खी पोलीस चौकीच सस्पेंड!

Crime News : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमधील तीन बड्या अधिकाऱ्यांची बदली केली, त्याशिवाय अख्खी पोलीस चौकीच सस्पेंड केली.
महिलेची छेड काढली टवाळखोरांनी, बदली बड्या अधिकाऱ्यांची अन् अख्खी पोलीस चौकीच सस्पेंड!
social Media
Published On

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमधील तीन बड्या अधिकाऱ्यांची बदली केली, त्याशिवाय अख्खी पोलीस चौकीच सस्पेंड केली. त्याला कारण ठरलं म्हणजे, पावसाच्या पाण्यामध्ये काही टवाळखोरांनी पाणी उडवत एका महिलेची छेड काढली होती. ही घटना घडली, त्याजवळच पोलीस चौकी होती, तरीही पोलिसांकडून तात्काळ कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याप्रकरणाबाबत विरोधकांनी हल्लाबोल चढवला. विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन बड्या अधिकऱ्यांवर कारवाई केली. डीसीपी, एडीसीपी आणि एसीपी यांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या. त्याशिवाय गोमतीनगर येथील अख्खी पोलीस चौकीतील पोलीस सस्पेंड करण्यात आली.

गोमतीनगर येथे पावसाच्या पाण्यात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. दुचाकीवरही काही तरुण त्यावेळी पाण्यात गाडी चालवत होती. योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी याप्रकरणावर अॅक्शन घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कारवाईचा बडगा उघारला. राज्यातील महिलांची सुरक्षा आपली प्राथमिकता असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर बीएनएस सेक्शन 191 (2), 3 (5), 272, 285 आणि 74 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेबाबत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभागृहात चांगलेच संतापलेले दिसले. ते म्हणाले की, मी इथं नोकरी करायला आलो नाही. जो काही करेल, तो भरेल, हे सांगायला मी इथं आलोय. त्यासाठी आम्ही लढू. ही आमची सामान्य लढाई नाही. प्रतिष्ठेची लढाई नाही. मला प्रतिष्ठा मिळवायची असते, तर मी यापेक्षा माझ्या मठात जास्त प्रतिष्ठा मिळवली असती. माझ्यासाठी याची काही गरज नाही.

गोमतीनगर घटनेतील दोषींची यादीही माझ्याकडे आली आहे. पवन यादव हा पहिला दोषी आहे. दुसरा गुन्हेगार मोहम्मद अरबाज आहे. काळजी करू नका. त्या बुलेट ट्रेनची तयारी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com