Ayodhya Ram Mandir Update - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामजन्मभूमी येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या दिव्य गर्भगृहाच्या बांधकामाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामाचा पहिला दगड ठेवून पायाभरणी केली. यावेळी महंत नृत्य गोपाल दास, उपमुख्यमंत्री केशव मौर्य, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्यासह सुमारे २५० संत आणि राजकीय नेते उपस्थित होते. या मंदिराची पायाभरणी ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली होती. तेव्हापासून या मंदिरचे बांधकाम सुरू आहे.
हे देखील पाहा -
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, गर्भगृहाचे पायाभरणी करणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम सुमारे २ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरू करण्यात आले आणि हे बांधकाम यशस्वीपणे सुरू आहे. अयोध्या धाममध्ये केवळ मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जाणार नसून ते देशातील आणि जगातील तमाम सनातन हिंदू धर्मीयांचे श्रद्धेचे प्रतीक बनेल.
डिसेंबर 2023 पर्यंत गाभाऱ्याचं काम पूर्ण
श्री राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायाभरणीनंतर डिसेंबर 2023 पर्यंत गाभाऱ्याचं काम पूर्ण होणार आहे अशी माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर 2024 च्या मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात रामललाची स्थापना केली जाईल.
9 नोव्हेंबर 2019 राम मंदिराच्या बाजूने निर्णय आला. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली. सध्या राम मंदिर उभारणीचं काम जोरदार सुरू आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.