बिहार : बिहार मधील सारेन जिल्ह्यातील छपरा शहरातील जाफरपूर भागात एका सोने व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकर्यांनी व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर 40 हून अधिक वार करून ही निर्मम हत्या (Brutal Murder) केलीय! अरुण शाह असे हत्या करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अरुण शहा यांच्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे. अरुण शाह काल रात्री एका लग्न समारंभात (Marriage Ceremony) मेजवानीसाठी गेले होते. तेथून सकाळी ते आपल्या मित्रासोबत परतत होते. याच दरम्यान काही गुंडांनी त्यांना घेरले आणि वाटेतच त्यांची निर्घृण हत्या केली. यादरम्यान त्यांचा मित्र आशिष श्रीवास्तव हा कसा तरी त्याचा जीव वाचवून घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला.
हे देखील पहा :
त्यानंतर त्याने फोनवरून या घटनेनबाबत माहिती दिल्याने नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेहाजवळ अरुण शाह यांची दुचाकी, हेल्मेट आणि बूट पडलेला होता, जो पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, मृताचा मोबाईल गायब आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत आशिष श्रीवास्तव देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी उघडपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सध्या आशिष श्रीवास्तव याला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत.
पोलिस अनेकांची चौकशी करत असले तरी या प्रकरणात पैशांच्या व्यवहाराचा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे एसपी संतोष कुमार यांनी सांगितले. घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेल्या मृत व्यक्तीच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे, तसेच त्याच्या कॉल डिटेल्सचाही शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मृत व्यक्तीला ज्या मित्रासोबत शेवटचे पाहिले होते त्याचीही चौकशी केली जात असून, त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र, पुरावे मिळाल्यानंतरच यावर सविस्तर बोलू, असे एसपी म्हणाले.
मृताचा भाऊ मंटू कुमार याने सांगितले की, माझ्या भावाचे कोणाशीही वैर नव्हते. माझा भाऊ एका मित्रासोबत शेवटच्या वेळी बाहेर गेला होता. मात्र, त्याच्या मित्राने नंतर सांगितले की काही लोकांनी त्याच्या भावावर हल्ला केला आणि जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा अरुण शाहची हत्या करण्यात आली होती.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.