Chandrayaan-3 Update News: चांद्रयान-3 चंद्राची नवी विहंगम दृश्ये जगासमोर आणेल: डॉ जितेंद्र सिंह

Chandrayaan 3 Launch Date : चांद्रयान-3 चंद्राची नवी विहंगम दृश्ये जगासमोर आणेल: डॉ जितेंद्र सिंह
Chandrayaan-3 Update News
Chandrayaan-3 Update NewsSaam Tv
Published On

Chandrayaan 3 Launch Date : चांद्रयान-3 चंद्राची नवी विहंगम दृश्ये जगासमोर आणेल, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

भारताची याआधीची मोहीम , चांद्रयान-1 ने चंद्राच्या विविध पैलूंवर नवीन प्रकाश टाकला होता , चांद्रयान-1 या मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथमच जगासमोर आणला होता, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी ईटी (इकॉनॉमिक टाइम्स) वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

Chandrayaan-3 Update News
Darshana Pawar Death Case New Update: प्रेम प्रकरणातूनच दर्शनाची हत्या! तपास झाला पूर्ण, नवीन माहिती आली समोर....

आता संपूर्ण जग चांद्रयान -3 कडे मोठ्या विश्वासाने , अपेक्षेने आणि आशेने पाहत आहे आणि त्याच वेळी चंद्र तसेच विश्वाची अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि रहस्ये उलगडण्याची वाट पाहत आहे, असे ते म्हणाले.

चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या दिशेने एक पाऊल जवळ जाण्यासाठी खुणावत आहे आणि चंद्राच्या शोधात भारत इतर देशांच्या तुलनेत मागे नाही हे देखील दर्शवत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे हे चांद्रयान केवळ चंद्रावरून चंद्राचेच निरीक्षण करणार नाही तर चंद्रावरून पृथ्वी देखील पाहणार आहे, या मोहिमेमुळे भारत चंद्रावर अंतराळयान पाठवणाऱ्या तीन किंवा चार राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे, असे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Chandrayaan-3 Update News
Bharat Gogawale Comment on Aditi Tatkare : युतीत ठिणगी? पालकमंत्रिपदासाठी हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे, NCPच्या आमदाराची भरत गोगावलेंवर टीका

अमृत काळातील पुढील 25 वर्षांमध्ये भारताची उन्नती अंतराळातून सुरू झाली आहे आणि अंतराळ अर्थव्यवस्था भविष्यात सर्वांगीण आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असेल, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. या क्षेत्रात अधिक फलदायी परिणामांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com