नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनंतर जगभरातील 90 देशांमध्ये आता तिसऱ्या लाटेचा (Third Wave) कहर सुरू झाला आहे. भारतात (India) एप्रिल- आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. आता कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta Plus B16172) प्रकारातील विषाणूमुळे भारतातही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेल्टा प्लस प्रकार जगभरातील 90 हून अधिक देशांमध्ये पसरला असून त्या देशांमध्ये या विषाणूचे संक्रमण वेगाने पसरले असून तिसरी लाट निर्माण झाली आहे. (Savdhan India: Delta Plus variant infection is on the rise)
जागतिक आरोग्य संघटनेने विषाणूबाबत चिंता व्यक्त केली असून या विषाणूमुळे भारतात तिसऱ्या लाटेची शंकाही व्यक्त केली आहे. डेल्टा प्लस व्हेरीयंट अमेरिकेपासून युरोप आणि आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया पर्यंत 90 हून अधिक देशांमध्ये आढळून आला आहे. डेल्टा प्लस व्हेरीयंट सर्वात प्रथम भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळून आला होता. तर डब्ल्यूएचओने मे मध्ये जगभरात डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. तर दुसरीकडे कोरोनाचा डेल्टा प्रकार वाढणारा धोका आहे. तो मूळ कोरोना विषाणू आणि अल्फा प्रकारांपेक्षा ती अधिक वेगाने पसरतो, अशी भीती अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फौसी यांनी व्यक्त केली होती.
डेल्टा प्लस प्रकार देशातील 12 राज्यांत पसरला असून महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय शनिवारी गुजरातमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटची पहिली घटना आढळली. त्याशिवाय लुधियाना आणि चंदीगडमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे सापडली आहेत. अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली होती. भारतातही डेल्टा प्लस व्हेरियंटचा विषाणू वेगाने पसरू लागला आहे.महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळू लागले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आतापर्यंतच्या सर्व प्रकारांमध्ये डेल्टा प्लसकहा विषाणू सर्वाधिक वेगाने पसरणारा विषाणू आहे. अल्फा प्रकारापेक्षा डेल्टा प्रकार 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.