Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो? कॅनडाचे PM जस्टिन ट्रूडो यांना संशय

Justin Trudeau blame India : कॅनडाची सुरक्षा एजन्सी भारत आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा संबंध तपासत आहेत.
 Justin Trudeau
Justin Trudeau Saam TV

Canada PM News :

खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताकडे रोख केला आहे. ट्रूडो यांनी सोमवारी या गोळीबारामागे भारतचा हात असल्याचा दावा केला आहे. सीबीसीच्या रिपोर्टनुसार, जस्टिन ट्रूडो म्हणाले की, कॅनडाची सुरक्षा एजन्सी भारत आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा संबंध तपासत आहेत.

पीएम ट्रूडो यांनी म्हटलं की, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी भारतीय सरकारी एजंट आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर हत्येतील आरोपांचा पाठपुरावा करत आहेत. 18 जून रोजी कॅनडातील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (Latest Marathi News)

 Justin Trudeau
Women Reservation Bill: मोदी सरकारचं मोठं पाऊल; महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

जी -20 शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हा मुद्दा उपस्थित केला होता. कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आपली चिंता व्यक्त केली, असं ट्रूडो यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी देखील जस्टिन ट्रूडो यांच्याकडे कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

 Justin Trudeau
Explainer: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयक काय आहे, का होत आहे विरोध?

पंतप्रधान कार्यालयाकडून कॅनडाला प्रत्युत्तर

अतिरेकी शक्तींचा संघटित गुन्हेगारी, ड्रग सिंडिकेट आणि मानवी तस्करीशी संबंध हा देखील कॅनडासाठी चिंतेचा विषय असावा. कॅनडामध्ये भारतीय समुदाय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले जात आहे, असं पीएमओने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com