नवरदेव दारुच्या नशेत दिसताच नवरी संतापली; भर मंडपात सिनेस्टाईल हाणामारी

Wedding Cancel : वरातीत वऱ्हाडी मंडळींसह वरानेही अक्षरश: दारू ढोसली होती
Marriage
Marriage Saam TV
Published On

मधुबनी : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातून एक धक्कादायक पण धाडसी घटना समोर आली आहे. येथील एका वधूने दारूच्या नशेत आलेल्या वराशी लग्न करण्यास नकार दिला. वधूच्या निर्णयामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तिच्यावर लग्नासाठी दबाव देखील टाकण्यात आला. मात्र कुठल्याही दबावाला न जुमानता आणि न घाबरता ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. सरतेशेवटी वराला आणि वऱ्हाडी मंडळीला आल्या पावलीच माघारी परतावे लागले.

Marriage
समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम; लग्नासाठी घरातूनही पळाल्या, पण शेवटी आलं वेगळंच वळण

वधुने अचानक उचललेल्या या पावलाचं संपूर्ण मधुबनी जिल्ह्यात कौतुक होत आहे. बिहारमध्ये सध्या दारूबंदी कायदा लागू आहे. राज्यात कुठल्याही प्रकारचं मद्यपान करण्यास मनाई आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संपूर्ण राज्य दारूमुक्त करायचं आहे. अशातच या धाडसी लोकांमुळे बिहार दारूमुक्त होऊ शकतं अशी चर्चा आता सर्वत्र जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुबनी जिल्ह्यातील काजल कुमारी नामक तरुणीचं लग्न नेपाळमधील भदरिया गावातील रहिवासी राजू सदा याच्याशी होणार होतं. लग्नासाठी भव्य मंडपही देण्यात आला होता. तसेच वऱ्हाडी मंडळीसाठी जेवणाची सोयही करण्यात आली होती. ठरलेल्या वेळेत वऱ्हाडी मंडळी गावात सुद्धा आली होती. मात्र लग्नमंडपात जाण्यापूर्वी वराकडील मंडळींनी वरात काढली. या वरातीत वऱ्हाडी मंडळींसह वरानेही अक्षरश: दारू ढोसली. जेव्हा ही वरात लग्नमंडपात आली तेव्हा वधूने मात्र नवरदेव नशेत असल्याचं पाहून लग्नास नकार दिला.

Marriage
पती झोपेत करायचा असे कृत्य, शेवटी कंटाळून पत्नीने घेतला अजब निर्णय!

अचानक लग्नास नकार दिल्याने लग्नमंडपात गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. नवरीमुलीचा हट्ट बघून नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. आणि क्षणार्धात या गोंधळाचं रुपांतर हाणामारीत झालं. वधूकडील मंडळींनी वरासह वऱ्हाडी मंडळींना चोप देत माघारी पाठवलं. वधूकडील मंडळीचं म्हणणं आहे की, वराकडील 100 पेक्षा अधिक लोकं दारूच्या नशेद धुंद होते.

बिहारमध्ये दारूबंदी कायद्याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. असे असतानाही दारूबंदी कायद्याची टिंगलटवाळी होत असल्याच्या बातम्या रोज येत असतात, अशा स्थितीत बसोपट्टीच्या या धाडसी वधूने ज्या प्रकारे दारू पिऊन वऱ्हाडी मंडळींना परत करण्याचे धाडस दाखवले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com