PUBG साठी गोळ्या झाडून आईची हत्या; 3 दिवस मृतदेहाजवळ बसून राहिला अन्...

अखेर पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण घटना उघड झाली.
UP Crime News in Marathi, PUBG Crime News
UP Crime News in Marathi, PUBG Crime NewsSaam Tv

लखनऊ - उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये (Lucknow) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने PUBG खेळण्यास नकार दिल्याने 16 वर्षांच्या मुलाने आईची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मृतदेह तीन दिवस घरात लपवून ठेवण्यात आला होता. इतकेच नाही तर या मुलाने आपल्या लहान बहिणीला एका खोलीत बंद करून ठेवले होते. ३ दिवसानंतर मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागताच आरोपींनी हत्येची खोटी कथा रचून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची चैकशी करायला सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या (Police) चौकशीत संपूर्ण घटना उघड झाली. (UP Crime News in Marathi)

हे देखील पाहा -

ही घटना लखनऊच्या पीजीआय भागात घडली आहे. साधनाचा नवरा कोलकाता येथे राहतो. तो लष्करी अधिकारी आहे. साधना या अल्डिको कॉलनीत १६ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या. साधना यांच्या मुलाला PUBG गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे. आईने PUBG गेम खेळण्यापासून नकार दिल्याने मुलगा आईसोबत भांडण करू लागले.

रविवारी आईने पुन्हा एकदा PUBG गेम खेळणं बंद कर असे सांगितल्याने रागाच्या भरात मुलाने वडिलांचे परवाना असलेले पिस्तूल उचलत आईच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात आईचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलाने रिव्हॉल्व्हर तिथेच बेडवर सोडले. यानंतर आरोपीने लहान बहिणीला धमकावून दुसऱ्या खोलीत बंद केले.

UP Crime News in Marathi, PUBG Crime News
सोशल मीडिया 'किंग' कोहलीने गाठला इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विराट आकडा

तीन दिवसांपासून मुलगा घरात आईच्या मृतदेहासोबत राहत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा दुर्गंधी वाढल्याने मुलाने वडिलांना फोन करून आईच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, मुलाकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर त्याने त्यांची दिशाभूल केली आणि इलेक्ट्रीशियन घरी आला होता आणि त्यानेच आईची हत्या केल्याची सांगितले. पण, अडीच तासांच्या तपासात संपूर्ण सत्य बाहेर आलं आणि पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com