देशात 46 रेल्वे स्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी; ATS यंत्रणा अलर्ट

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक धमकीचे पत्र पाठवले आहे.
देशात 46 रेल्वेस्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी; ATS यंत्रणा अलर्ट
देशात 46 रेल्वेस्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी; ATS यंत्रणा अलर्टSaam Tv
Published On

लखनऊ : दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने (Lashkar-e-Toiba) रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या GRP वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक धमकीचे पत्र पाठवले आहे. लष्कर-ए-तोयबाच्या एरिया कंमाडरच्या नावाने हे पत्र आहे. या पत्रामध्ये दिपावलीच्या तोंडावर देशातील विविध रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोट bomb blast at 46 railway stations in India घडवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित रेल्वे स्थानकांमध्ये लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांचा समावेश केला गेला आहे. दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर, रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर वाराणसी, हापूर, लखनौसह 46 रेल्वे स्थानकांवर लष्कर-ए-तैयबाकडून उड्डाण करण्याच्या धमकीची दहशतवादविरोधी पथक (ATS) चौकशी करणार आहे.

हे देखील पहा-

लष्कर-ए-तैयबाच्या नावाने धमकीचे पत्र कोणी पाठवले आहे, त्यामागील सत्य काय आहे, या संपूर्ण प्रकरणाची एटीएस चौकशी करणार आहे. सर्व पैलूंवर लक्ष ठेवून एटीएस या संपूर्ण घटनेचा तपास करणार आहे. धमकीचे पत्र आले कुठून? कोणी पाठवले? त्याची चौकशी केली जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात आलं आहे.

लखनऊ, कानपूरसह संबंधित सर्व रेल्वे स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी आणि श्वान पथकासह सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. याशिवाय रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू आढळून आल्यास त्याची कसून तपासणी केली जात आहे.

देशात 46 रेल्वेस्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी; ATS यंत्रणा अलर्ट
नवाब मलिक हे नशा करून बोलतात- आ. अभिमन्यू पवार

रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, लष्कर-ए-तोयबाच्या एरिया कमांडरच्या नावाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. संबंधित पत्रामध्ये उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोट घडवणार अशी धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधी देखील 2018 मध्ये देखील दहशतवादी संघटनेने अशाप्रकारची धमकी दिली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com