Ecuador Jail Violence : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमधील Ecuador एका तुरुंगात कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी riots between two gangs झाल्याची माहिती समोर आली आहे. इक्वेडोर तुरुंगात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोक जखमी झाले आहेत. ही थरारक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि लष्कर प्रयत्न करत होते. जेल मध्ये झालेल्या या संघर्षात बॉम्ब, गोळ्या, चाकू या वस्तू देखील वापरल्या गेल्या. तर सध्या अमेरिका लष्कराने संपूर्ण कारागृह jail परिसराला घेराव घातला आहे.
हे देखील पहा-
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिकन देश इक्वाडोरमधील ग्वायाकिल तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये रक्तरंजित हाणामारी झाली. या रक्तरंजित संघर्षात 100 हून अधिक लोक मरण पावले, त्यापैकी बहुतेक कैदी होते. तर 52 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
असे सांगितले जात आहे की, इक्वेडोर तुरुंगातील या संघर्षात गोळ्या देखील झाडल्या गेल्या, चाकू देखील काढण्यात आले आणि अनेक स्फोट देखील झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. कैद्यांचे दोन्ही गट ड्रग्स तस्करीशी जोडलेले आहेत, अशी माहिती देण्यात येत आहेत. राष्ट्रीय अभियोक्ता कार्यालयाने म्हटले आहे की, सहा लोकांचे शिरच्छेद करण्यात आले आहेत, तर यामध्ये दोन पोलीस अधिकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत.
इक्वाडोरच्या कारागृह सेवेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पोलिस आणि सैन्याला ग्वायाकिल तुरुंगातील हिंसाचारानंतर सुमारे पाच तासांनंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. तर सध्या परिस्थिती पूर्णपणे प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.