सातारा : भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रीय स्तरावर आज काही नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे (vinod tawde) यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री झाल्यानंतर निर्माण झालेली रिक्त जागेवर भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले तावडे यांची सरचिटणीसपदी वर्णी लागलेली आहे.
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी या नियुक्त्या केल्या आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी अधिकृत निवेदनाद्वारे त्यांची घोषणा केली.
विनाेद तावडे यांच्याबराेबरच ऋतुराज सिन्हा (बिहार), आशा लाकडा (झारखंड) यांची राष्ट्रीय सचिव तसेच माजी आयपीआस अधिकारी भारती घाेष (पश्चिम बंगाल), शहजाद पूनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी या नियुक्त्या झाल्याने संघटना आणखी मजबूत होईल असा विश्वास पक्षातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तावडे यांच्या नियुक्तीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.