कथित सेक्स स्कॅंडल प्रकरणी भाजप नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजीनामा

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मंत्र्याचे सेक्स स्कँडल समोर आल्याने BJP ला मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे आणि विरोधकांना हा एक आयता मुद्दा मिळाला.
कथित सेक्स स्कॅंडल प्रकरणी भाजप नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजीनामा
कथित सेक्स स्कॅंडल प्रकरणी भाजप नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजीनामाSaamTV

गोवा : गोव्यात गाजत असलेल्या कथित मंत्री सेक्स स्कँडल प्रकरणी अखेर भाजपच्या मिलिंद नाईक (BJP Milind Naik) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याप्रकरणी काँग्रेसने (Congress) महिलेवर लैंगिक अत्याचाराचे आरोप मंत्री नाईक यांच्यावर केले होते काल काँग्रेसच्या संकल्प आमोणकर यांनी पणजीच्या महिला पोलिस स्थानकामध्ये नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल करून या संबंधित सर्व पुरावे सादर केले होते आणि तातडीने या मंत्र्यांवर कारवाई ची मागणी केली होती.

हे देखील पहा -

त्यानंतर रात्री उशिरा मिलिंद यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मंत्र्याचे सेक्स स्कँडल समोर आल्याने भाजपला (BJP) मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे आणि विरोधकांना हा एक आयता मुद्दा मिळाला.

कथित सेक्स स्कॅंडल प्रकरणी भाजप नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजीनामा
गरोदरपणात आईला कोरोना झाल्यास बाळाला होत नाही; मात्र 'या' परिणामाची शक्यता...

मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी गोवा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. असे म्हंटले असले तरी गेल्या 15 दिवसापासून काँग्रेस ही मागणी करत होते. हा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहीती, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com