भाजप नेत्याकडून मोदींची तुलना महात्मा फुलेंशी; म्हणाले, मोदीही समाजसुधारक

'महात्मा फुले ज्याप्रमाणे समाजसुधारक होते त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांना समाज सुधारकाच्या रूपात पाहण्याची आवश्यकता आहे.'
BJP
BJPSaam TV
Published On

नवी दिल्ली : महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजित केले होते. या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना महात्मा फुलेंसोबत केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

भाजपकडून या आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदीं याबाबत 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी!' नावाचं पुस्तक प्रदर्शित करण्यात आलं होतं त्यावेळी देखील भाजपवर खूप टीका झाली होती. अशातच आता भाजप पक्षप्रवक्ते संबीत पात्रा (Sambit Patra) यांनी 'महात्मा फुले ज्याप्रमाणे समाजसुधारक होते त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांना समाज सुधारकाच्या रूपात पाहण्याची आवश्यकता आहे.' असं वक्तव्य केलं आहे. ते पुढे म्हणाले, मोदी केवळ जागतिक स्तरावरील नेते नव्हेत तर ते समाज सुधारकांप्रमाणेच दिवसभर अथक परिश्रम करतात असं म्हणत पात्रा यांनी पुन्हा एकदा मोदींना समाजसुधारकांच्या पंक्तीत बसविण्याचा प्रयत्न केला.

तसंच मोदी देखील महात्मा फुलेंप्रमाणे अविरत काम करतात, मागील ८ वर्षे हिंदुस्तानच्या राजकारणातील अतिशय महत्वपूर्ण वर्षे ठरली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन असा योजना राबविल्या आहेत की ज्याद्वारे महिलांचे सशक्तीकरण होऊ शकेल व मागासवर्गीय लोक पुढे जावेत.

हे देखील पहा -

महात्मा फुले जसे समाज सुधारक आहेत तसेच मोदीही समाज सुधारकांप्रमाणे दिवसभर परिश्रम करतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मोदींना ‘समाज सुधारक' या रूपात पाहण्याचीही आवश्यकता आहे असेही पात्रा म्हणाले. तसंच सुधारकांचे अग्रणी महात्मा ज्योतिराव फुले हे सामाजिक न्यायाचे ‘चॅम्पियन' होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारतर्फेही दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले. भाजपनेही यानिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित केले आहे.

दरम्यान, मोदींनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, सामाजिक न्यायाचे कैवारी आणि असंख्य लोकांसाठी आशेचा स्रोत, म्हणून महात्मा फुले सर्वत्र आदरणीय आहेत. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com