Lakhimpur: शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्यासह आणखी 4 जणांना अटक

लखीमपूर खेरी प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेशी संबंधित अन्य ४ आरोपींना यूपी पोलिसांनी अटक
Lakhimpur: शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्यासह आणखी 4 जणांना अटक
Lakhimpur: शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्यासह आणखी 4 जणांना अटकSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : लखीमपूर खेरी प्रकरणामध्ये lakhimpur kheri शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेशी संबंधित अन्य ४ आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केली आहे. यात भाजप नेते सुमित जयस्वाल BJP leader sumit Jaiswal यांचा देखील समावेश आहे. जे घटनेच्या वेळी त्या एसयूव्हीमध्ये स्वार होते. सुमित जयस्वाल हे भाजपचे स्थानिक नेते आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान, सुमित जयस्वाल यांनी अज्ञात शेतकर्‍यां विरोधात एफआयआर FIR दाखल करण्यात आला होता. चालक, मित्र आणि २ भाजपच्या कार्यकर्त्यांना मारेकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला Ashish Mishra अगोदरच अटक करण्यात आली आहे. लखीमपूर घटनेत ४ शेतकऱ्यांसह एक पत्रकार ठार झाला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर दिवशी लखीमपूर खेरी या ठिकाणी घडली आहे.

Lakhimpur: शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्यासह आणखी 4 जणांना अटक
Aurangabad: आज पाच लाख लिटर दुधाची विक्री; मुंबईला जाणारे दूधही रोखले

त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सुमित जयस्वाल यांच्या व्यतिरिक्त शिशुपाल, नंदन सिंह बिष्ट आणि सत्य प्रकाश त्रिपाठी यांना लखीमपूर खेरी पोलीस UP Police आणि गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, की सत्य प्रकाश त्रिपाठी यांच्याकडून रिव्हॉल्व्हर आणि ३ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी यूपी पोलिसांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला आधीच अटक केली आहे. शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी एका व्हिडिओत सुमित जयस्वाल हे एसयूव्हीच्या बाहेर पळताना दिसत आहेत. जयस्वालांच्या स्टेटमेंटच्या आधारे ओळख पटली आहे. मात्र, सुमित यांनी हा आरोप फेटाळला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com