National Politics: राज्यसभेत भाजपने गाठले शतक

केंद्रात गेली ८ वर्षे सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतही १०० सदस्य झाले आहेत
National Politics: राज्यसभेत भाजपने गाठले शतक संसद
National Politics: राज्यसभेत भाजपने गाठले शतक संसद- Saam TV
Published On

नवी दिल्ली : केंद्रात गेली ८ वर्षे सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतही १०० सदस्य झाले आहेत. वरिष्ठ सभागृहात शतक गाठणारा भाजप १९९० नंतर पहिला पक्ष ठरला आहे. अर्थात २४५ सदस्यांच्या राज्यसभेत भाजप निखळ बहुमतापासून अजूनही दूर आहे. (BJP Crossed hundred Number Rajya Sabha)

आसाम, त्रिपुरा व नागालॅंड या तीन राज्यांतून अलीकडेच भाजपने (BJP) राज्यसभेवर आपले तीन उमेदवार निवडून आणले. सध्या भाजपकडे राज्यसभेत ९७ सदस्यांचे बळ आहे. हे तीन नवे सदस्य धरले तर भाजपचे संख्याबळ १०० वर जाते. २०१४ मध्ये राज्यसभेत भाजपचे ५५ सदस्य होते. मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाल्यापासून भाजपने राज्यसभेतील बहुमताची कमतरता व त्यामुळे प्रत्येक महत्वाच्या विधेयकावेळी येणारे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न चिकाटीने सुरू ठेवले आहेत.

National Politics: राज्यसभेत भाजपने गाठले शतक संसद
CM Uddhav Thackeray: सरकार तुमच्या पाठीशी नाही तर सोबत - मुख्यमंत्री

मोदी सरकार आले त्यावेळी येथे बहुमतात असलेल्या कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी सरकारला वारंवार अडचणीत आणले. त्यामुळे या सभागृहात भाजपने संख्याबळाचे शतक गाठणे हा फार मोठा पल्ला मानला जातो. नुकत्याच ६ राज्यांतील १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पंजाबात अकाली दल दूर गेल्याने भाजपला त्या रज्यात एका जागेचा तोटा झाला. पण हिमाचल प्रदेशासह तीन राज्यांत एका एका जागेचा फायदा झाला.

पंजाबात पाचही खासदार आम आदमी पक्षाचे निवडून येणार आहेत. या वर्षात उत्तर प्रदेशातील ११ पैकी किमान ५ ते ६ जागा भाजपला मिळू शकतात. दरम्यान भाजपचा राज्यसभेतील चढता ग्राफ दक्षिणेच्या राज्यांत अडविला जाऊ शकतो. यंदा राज्यसभेतून ७२ सदस्य निवृत्त होत आहेत. येत्या काळात आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, राजस्थान व झारखंड या राज्यांतून भाजपला फारशी आशा ठेवण्यासारखी राजकीय परिस्थिती नाही.
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com