Land For Job Scam: नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई, लालू प्रसाद आणि कुटुंबीयांची 6 कोटींची मालमत्ता जप्त

Lalu Prasad Yadav News: नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई, लालू प्रसाद आणि कुटुंबीयांची 6 कोटींची मालमत्ता जप्त
Lalu Prasad Yadav on Pm Modi
Lalu Prasad Yadav on Pm ModiSaam TV
Published On

Land For Job Scam: नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात (Land for job) अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. ईडीने लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाची 6 कोटींची मालमत्ता जप्त केली.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कथित 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या (CBI) पथकाने याप्रकरणी लालू कुटुंबातील अनेक सदस्यांची चौकशी केली आहे.

Lalu Prasad Yadav on Pm Modi
Crop Insurance: पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून 'जमिनीच्या बदल्यात नोकरी'चे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. सीबीआयने यापूर्वी दोनदा या प्रकरणाचा तपास केला असून त्यांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. यानंतर सीबीआयने हे प्रकरण बंद केले होते. मग आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करून काय जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.  (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांना कथितपणे भेटवस्तू किंवा विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये केलेल्या नियुक्त्यांशी संबंधित आहे. याचाही तपास सीबीआय करत आहे.

Lalu Prasad Yadav on Pm Modi
Manipur Viral Video Case: मणिपूर अत्याचार प्रकरणातील पीडितांची सुप्रीम कोर्टात धाव, CBI चौकशी आणि खटला आसामला हस्तांतरित करण्यास विरोध

सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. याचाच तपास सीबीआय करत असून याचप्रकारणी लालू यांच्या कुटुंबीयांची 6 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com