Bihar Muzaffarpur News: अख्ख्या कुटुंबासाठी ठरली काळरात्र; झोपेत असतानाच घराला भीषण आग, ४ मुलींचा होरपळून मृत्यू

Bihar muzaffarpur Fire News: एकाच कुटूंबातील चौघांवर काळाचा घाला | परिसरात पसरली शोककळा...
Bihar FIre News
Bihar FIre NewsSaamtv

Bihar News: बिहारच्या मुझपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्रीच अचानक घराला आग लागल्याने एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. रामदयाळू स्थानकाजवळील झोपडपट्टी वसाहतीतील ही घटना आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

Bihar FIre News
Sharad Pawar Resigns: शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? 'या' ४ नावांची होतेयं सर्वाधिक चर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये काल रात्री उशिरा झोपडीला आग लागल्याने हाहाकार माजला. या आगीत घरात झोपलेल्या 4 मुली जिवंत जळाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुर्घटनेत ५ जण गंभीर भाजले आहेत. रात्री उशिरा या झोपडीला आग लागली. ज्यामध्ये घरात झोपलेल्या नरेश राम यांच्या चार मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला.

आगीच्या भक्षस्थानी आलेल्यांमध्ये सोनी (वय २ वर्ष), शिवानी (वय ८ वर्ष), अमृता (वय ५ वर्ष) आणि वर्षा (वय ३ वर्ष) अशी मृत मुलींची नावे आहेत. झोपेत असतानाच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bihar FIre News
Dombivali News: खाकी वर्दीला सलाम! शर्टवरील लेबवरून पटवली मृत व्यक्तीची ओळख

दरम्यान, या आगीत ५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर एसकेएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. भीषण आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. टाउनशिपचा रस्ता जिथून सुरू होतो, त्या टाउनशिपमधून बाहेर पडण्याच्या मार्गाच्या मधोमध कुठेतरी अचानक आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळेच अनेकांना तेथून पळही काढता आला नसल्याचे बोलले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com