शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स तब्बल १४५० अंकांनी कोसळला, निप्टीतही मोठी घसरण

सेन्सेक्स तब्बल 1450 अंकांनी कोसळला.
Share Market News Updates, Sensex Updates, Nifty Today, Sensex Today, share market news today
Share Market News Updates, Sensex Updates, Nifty Today, Sensex Today, share market news today Saam Tv
Published On

मुंबई : शेअर मार्केट (stock market) सुरू होताच पहिल्याच सत्रात मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर झाला. परिणामी सेन्सेक्स तब्बल 1450 अंकांनी कोसळला.

Share Market News Updates, Sensex Updates, Nifty Today, Sensex Today, share market news today
७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी पत्नी नको; औरंगाबादेत पुरुषांकडून पिंपळपौर्णिमा साजरी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजार सेन्सेक्स (Sensex) 1118 अंकांच्या घसरणीसह 53184 च्या पातळीवर सकाळी सुरू झाला होता. तर दुसरीकडे निफ्टी (Nifty) 324 अंकांच्या घसरणीसह 15877 वर सुरू झाली होती. सध्या सेन्सेक्समध्ये 1450 अंकांची घसरण असून तो 52,850 पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्सबरोबरच दुसरीकडे निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही जवळपास 400 अंकांनी घसरला आहे. निप्टी सध्या 15,800 च्या पातळीवर स्थिरावली आहे. माहितीनुसार, निफ्टीवरील बँक आणि वित्तीय निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एल अँड टी, इंडसइंड बँक अशा जवळपास सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.

Share Market News Updates, Sensex Updates, Nifty Today, Sensex Today, share market news today
बीजिंगच्या 'बार'मध्ये कोरोना विस्फोट! 166 जणांना लागण, मास टेस्टिंग सुरू

घसरणीचे कारण काय?

देशात गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक कोसळले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य, खनिज तेलाचे वाढते दर आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अथकपणे सुरू असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे निर्देशांकातील घसरण अधिक वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com