उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; १० गिर्यारोहकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; हवाई दलाचे हेलिकॉप्टर रवाना

उत्तरकाशीतील (Uttarakhand) द्रौपदीच्या दांडा-२ पर्वत शिखरावर आज मोठी दुर्घटना घडली आहे.
Uttarakhand Avalanche
Uttarakhand AvalancheSaam TV
Published On

उत्तराखंड: उत्तरकाशीतील (Uttarakhand) द्रौपदीच्या दांडा-२ पर्वत शिखरावर आज मोठी दुर्घटना घडली आहे. हिमस्खलनामध्ये अडकून १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण अद्याप बेपत्ता आहेत. हे सर्व गिर्यारोहक नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधील (Mountaineer) आहेत.

अडकलेल्यांमध्ये नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (NIM) चे प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक आणि त्यांचे प्रशिक्षक यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील द्रौपदी दांडा-२ पर्वत शिखरावर २८ गिर्यारोहक हिमस्खलनात अडकले होते त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून अन्य बेपत्ता आहेत.

पाहा व्हिडीओ -

नेहरू पर्वतारोहण संस्थेचे प्राचार्य कर्नल बिश्त यांनी सांगितले की, हिमस्खलनात अडकलेल्या २८ पैकी १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १८ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता गिर्यारोहकांचं बचावकार्य सुरु आहे. एनआयएमच्या टीमसोबतच जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपीचे जवान बचावकार्यात सहभागी झाले आहेत.

तर अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) 2 चित्ता हेलिकॉप्टर देखील घटना स्थळी पाठवली आहेत. दरम्यानस ही दुर्देवी घटना जवळपास ५ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर घडल्यामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. द्रौपदी दांडा हे ठिकाण पाच हजार मीटर उंचीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com