
Audi Chaiwala Viral Video: सध्या उच्चशिक्षित तरुण अनेक प्रकारचे व्यवसाय करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अशा युवा उद्योजकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये आपल्याला बीएड चहावाले, ग्रॅज्यूअट चहावाला, असे अनेक उच्चशिक्षित तरुण व्यवसाय करताना दिसतात. मात्र सध्या एका चहावाल्या तरुणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
हा तरुण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तो चक्क ३ कोटींच्या ऑडीमधून चहा विकताना दिसत आहे. ज्यामुळे त्याचे नावही ऑडी चहावाला असे ठेवले आहे. सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल (Viral Video) मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
सोशल मीडियावर आपल्याला नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी भितीने गाळणही उडते. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला चहा विकताना दिसत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ही व्यक्ती 3 कोटींची ऑडी घेऊन चहा विकण्यासाठी आली होती. त्यामुळे या तरुणाला 'ऑडी चायवाला' या नावाने प्रसिद्धी मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओनुसार, त्या व्यक्तीने आपली ऑडी कार रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसत आहे. चहा विकण्याचे सर्व सामान त्याने गाडीच्या डिकीमध्ये ठेवले आहे. आणि तो रस्त्याच्या कडेला चहा बनवून विकत आहे. त्याचा हा निराळा स्वॅग पाहून रस्त्याच्या कडेने येणारा जाणारा प्रत्येकजण डोळे विस्फारुन पाहत आहे.
एका इंस्टाग्राम (Instagram) युजरने या ऑडी चहावाल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओला "चहा विकून ऑडी खरेदी केली की, ऑडी खरेदी केल्याने चहा विकावा लागतोय, हेच समजेना!" असा जबरदस्त कॅप्शनही देण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर या ऑडी चायवाल्याची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या तरुणाच्या या अनोख्या स्वॅगचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी हा सगळा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचेही म्हणले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.