न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये गोळीबार, १० जणांचा मृत्यू

न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला
Supermarket Firing
Supermarket FiringSaam Tv
Published On

नवी दिल्ली : न्यूयॉर्कमधील (New York) एका सुपरमार्केटमध्ये (Super Market) जोरदार गोळीबार (Firing) करण्यात आला झाला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार (Firing) करणार्‍या तरूण २९ वर्षीय आहे, तो कॉनकलिन परिसरात राहतो, त्याचे नाव पीटन गेंड्रोन असे आहे. आरोपींनी १३ जणांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये ११ कृष्णवर्णीय आहेत. बफेलो शहरापासून (city) लांब उत्तरेला गोळीबार झाला असल्याची माहिती प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे देखील पाहा-

आरोपींनी बफेलो येथून बंदुकीतून गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, ही द्वेष आणि जातीय प्रेरित हिंसा आहे. तसेच बफेलोचे महापौर (Mayor) बायरन ब्राउन म्हणाले की, हे खूप वाईट आहे. आम्हाला वाईट वाटत आहे आणि अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. आमच्या जखमा किती खोल आहेत हे शब्दात सांगता येत नाहीत. बंदुकधारी व्यक्तीने प्रथम टॉप्स सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये (parking) ४ जणांवर गोळ्या झाडल्या आहेत. त्यापैकी ३ जण मारले गेले, नंतर आत जाऊन गोळीबार सुरूच ठेवला, असे ग्रामाग्लिया यांनी सांगितले आहे.

Supermarket Firing
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण

न्यूयॉर्कच्या (New York) गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी देखील ट्विट केले आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बफेलोमधील लोकांना क्षेत्र टाळण्याबरोबरच कायद्याची अंमलबजावणी आणि स्थानिक अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास सांगितले. बंदुकधारी संपूर्ण घटनेचे लाईव्ह स्ट्रीम करत होता. यावेळी तो लष्करी उपकरणे असलेल्या एका दुकानात घुसला आणि लोकांना पार्किंगच्या ठिकाणी खेचत नेत होता. यानंतर त्याने आरोपींनी लोकांच्यावरती गोळीबार सुरू केला. संशयित सुपरमार्केटमध्ये प्रवेश करताना आणि इतर अनेक लोकांना गोळ्या घालताना स्पष्ट दिसला आहे. विशेष म्हणजे या गोळीबारात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com