Assembly Election 2022: पाच राज्यात निवडणुका होणार; आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

आज उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या जाणार आहे.
Election Commission of India
Election Commission of IndiaSaam Tv
Published On

नवी दिल्ली: कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) समोर दिसत असताना आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांची तारीख आज ता. 8 जानेवारी जाहीर करण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या जाणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध देखील लावले जाण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद (Press Conference) घेत आहे. (Election Commission of India)

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक देखील घेतली होती. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कोणत्या राज्यात? किती टप्प्यात आणि कोणत्या तारखेला कुठे-कुठे मतदान होणार हे समजणार आहे. (Assembly Election 2022)

मागील काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. परंतु कोरोनाच्या लाटेमुळे निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून निवडणुकीची प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे मोठ्या जाहीर सभांऐवजी, लहान सभा किंवा अन्य काही उपाय करण्याचे निर्देश निवडणूक आयोग देऊ शकतो.

तारखांसोबतच नावनोंदणीच्या तारखा, छाननी, निकाल आदींची माहितीही उपलब्ध केली जाईल. तसेच ज्या 5 राज्यात निवडणुका होणार आहेत त्यापैकी 4 राज्यांमध्ये भाजप प्रणित एनडीएचे सरकार (National Democratic Alliance) आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार. तर, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी, गोव्यामध्ये प्रमोद सावंत, मणिपूरमध्ये नॉन्गथोम्बम बिरेन सिंग. पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. (5 state election 2022)

Election Commission of India
Sagarika Ghatge Birthday: झहीर खान आणि सागरिकाची फिल्मी Love Story

या राज्यांचा विधानसभांचा कार्यकाळ कधी संपणार?

गोवा (Goa) राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी, उत्तराखंडचा कार्यकाळ 23 मार्च रोजी, पंजाब राज्याचा कार्यकाळ 27 मार्च रोजी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ 14 मे रोजी संपणार आहे. (Election Commission Press Conference)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com