Crime News
Crime News saam tv

Assam News: क्रूरतेचा कळस! पती आणि सासूची निर्घृण हत्या; फ्रिजमध्ये सापडले शरीराचे तुकडे

त्या दोघांनी मिळून ही हत्या केल्याचं पोलीस तपासात महिलेने सांगितलं आहे.
Published on

Assam Crime News: हत्या करून फ्रिजमध्ये शरीराचे तुकडे ठेवणे आणि नंतर एक एक तुकडा बाहेर फेकून येणे हत्येचा हा प्रकार सध्या अनेक घटनांमध्ये दिसत आहे. पहिल्यांदा श्रद्धा वालकरची अशी हत्या केली होती. या घटनेनं सगळ्यांचं हृदय हेलावलं.त्यानंतर निक्की प्रकरण ताजं असतानाच आसामयेथे अशीच एक हत्येची घटना घडली आहे. (Latest Assam Crime News)

या घटनेत महिलेने पती आणि सासूच्या नरडीचा घोट घेतला आहे. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस या संबंधी कसून चौकशी करत आहेत. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणी झालेल्या चौकशीवरून समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिला ही विवाहित असूनही तिचे बाहेर एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. त्या दोघांना एकत्र रहायचे होते.

Crime News
Akola Crime : आधी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल; अकोल्यातील तरुणासोबत घडलं तरी काय?

लग्नानंतर महिलेला प्रियकराला भेटता येत नव्हते. त्यामुळे तिने आणि तिच्या प्रियकराने पती आणि सासूला संपवण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी मिळून ही हत्या केल्याचं पोलीस तपासात महिलेने सांगितलं आहे.

Crime News
Crime News: प्लॅटफॉर्मवर गाढ झोपेतील प्रवाशाचे मोबाईल, दागिन्‍यांची चोरी; चोरटा सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

हत्या केल्या मृतदेह फ्रिजमध्ये

पती आणि सासूची हत्या केल्यावर महिलेने पतीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. दोघांच्याही शरीराचे आधी तुकडे केले. त्यानंतर वास येऊनये यासाठी ते तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. इतर नातेवाईकांना याचा संशय आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असता सदर घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना कलिता असं या महिलेचं नाव आहे. तसेच पती अमरज्योति डे आणि शानकारी डे असं सासूचं नाव आहे. वंदनाने पती आणि सासूच्या शरीराचे तुकडे केल्यावर त्यातील काही तुकडे प्रियकराच्या मदतीने चेरापूंजी येथे नेऊन फेकले. वंदनाने पोलिसांना ते ठिकाण देखील दाखवलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com