Article 370 Removed Reason: कलम ३७० का हटवलं? केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टात सांगितलं कारण

Jammu Kashmir News: काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात येणार, असा निर्णय केंद्र सरकराने घेतला.
Article 370 Removed Reason
Article 370 Removed ReasonSaam TV
Published On

Article 370:

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी याबाबत झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने ३७० कलम हटवण्याची कारणे सांगितली आहे. ती कारणे या बातमीतून जाणून घेऊ. (Latest Marathi News)

सोमवारी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने म्हटलं की, पुलवामा हल्ला झाल्यानंतर कलम ३७० विषयी विचार करण्यात आला होता. साल २०१९ मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर जिहादी हल्ला झाला होता. त्यामुळे काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात येणार, असा निर्णय केंद्र सरकराने घेतला.

Article 370 Removed Reason
Beed Crime News: धक्कादायक! महाराष्ट्रातून ट्रक पास करण्यासाठी हजारो रुपयांची लूट; वाहन चालकाचे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप

आपली बाजू मांडताना केंद्र सरकारने पुढे म्हटलं की, "कलम ३७० हटवण्यासठी कोणत्याही प्रकारे घाईगडबड करण्यात आलेली नाही. तसेच सुविचाराने हा निर्णय घेण्यात आला आहे." यावर तुषार मेहता यांनी म्हटलं की, आपण काय गमावलं आहे. याची लोकांना जाणीव झालीये. कलम ३५ ए हटवल्याने जम्मू काश्मीरमध्ये विविध गुंतवणूका येत आहेत. तसेच येथील पर्यटनाला चालना मिळालीये.

केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी याला विरोध केले. राज्यासह देशभरात विविध ठिकाणी निदर्शने झाली. जम्मू काश्मीरमधील जनतेला यामुळे त्रास होत आहे असं अनेक विरोधी पक्षांनी म्हटलं होतं. त्यामुळेच याबाबत दाखल याचिकेवर सोमवारी ११ वी सुनावणी पार पडली.

Article 370 Removed Reason
Kalyan Crime News: मुलीसोबत भावाचे अश्लील चाळे, बहिणीने बनवला व्हिडिओ; कल्याणमधील धक्कादायक घटना

या सुनावणीवेळी जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की, कलम ३७० हटवल्यानंतर जवळपास १६ लाखांहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. विविध हॉटेल्स उभे राहिल्याने अनेकांचा उदनिर्वाह होत आहे. सामान्यांच्या हाताल काम मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com