आता प्राण्यांचेही लसीकरण; देशात लाँच झाली प्राण्यांची Corona लस

भारतातील प्राण्यांसाठी विकसित केलेली पहिली कोरोना लस लवकरच प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना देण्यात येणार आहे.
Anocovax Vaccine
Anocovax VaccineSaam TV

नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR ने 'अ‍ॅनोकोव्हॅक्स' ही भारतातील प्राण्यांसाठीची पहिली लस विकसित केली असून ती लवकरच प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना देण्यात येणार आहे. ही लस केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते लाँच करण्यात आली.

लस (Vaccine) लाँच करताना कृषीमंत्री तोमर म्हणाले, 'शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे, लस आयात करण्याऐवजी आपण आपल्या देशात लस विकसित करण्यात स्वयंपूर्ण बललो असून हे खरोखरच मोठं यश आहे असं कृषीमंत्री म्हणाले.

अ‍ॅनोकोव्हॅक्स (Enokovax) ही प्राण्यांसाठी सार्स-कोव्ह-२ डेल्टा (SARS-CoV-2 Delta) लस असून सार्स कोव्हच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारच्या विषाणूंपासून प्राण्याचं संरक्षण करण्याची क्षमता या लसीमध्ये असून ती सिंह, बिबट्या, कुत्री, ससे आणि उंदीर यांच्यासाठी सुरक्षित असल्याचंही ICAR कडून सांगण्यात आलं आहे.

हे देखील पाहा -

देशात आलेल्या कोरोनाच्या (Corona) ३ लाटांमध्ये माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संसर्ग झाल्यामुळे अनेक प्राण्याचा मृत्यू देखील झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता सिंहाना ही लस देण्यात येणार आहे.

देशभरातील प्राणीसंग्रहालयांमधील (Zoo) आतापर्यंत जवळपास १६ सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही सिंहांचा मृत्यू देखील झाला आहे. शिवाय आता आय़सीएआरने विकसित केलेली कोरोना लसीचा पहिला वापर सिंहांवर केला जाणार आहे. दरम्यान, लसीचे तंत्रज्ञान तयार आहे, मात्र, लस अंतिम वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी मंजुरी आवश्यक असल्याचं ICAR च्या डायरेक्टर जनरल डॉ. त्रिलोचन महापात्रा म्हणाल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com