Viral Video: अॅनाकोंडासोबत खेळत होता, परिणाम तर भोगावेच लागतील, अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?
Anaconda viral video
Anaconda viral videosaam tv
Published On

मुंबई : रानावनात फिरताना तसेच सोसायटीच्या आवारात गवताच्या झाडीत विषारी,बिनविषारी साप फिरताना आपण नेहमी पाहिले असतील. साप म्हटलं की अंगावर काट येणारचं, पण सापांच्या प्रजातीमधील भला मोठा साप म्हटलं,की डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहते, ते म्हणजे अॅनाकोंडाचं....

सिनेमाच्या माध्यमातून अॅनाकोंडा सापाचे (Anaconda Snake) दर्शन अनेकांना घडले असेल, सिनेमा पाहतानाही अनेकांचा थरकाप उडवणारा साप अॅनाकोंडा प्रत्यक्षात समोर आल्यावर पळता भूई झाली नाही,तर नवलंच. जगभरात अनेक सापांच्या जाती आढळतात पण यामध्ये किंग कोबरा, क्रेट आणि रसल वायपर या विषारी सापांचा दंश झाल्यावर माणासाचा मृत्यू होऊ शकतो. काही साप विषारी नसतात पण आक्रमक असतात. (Anaconda bite viral video on social media)

Anaconda viral video
Sanjay Raut: संजय राऊत यांची अटक अवैध पद्धतीने; कोर्टाच्या ऑर्डर कॉपीमध्ये उल्लेख

यामध्ये अजगर आणि अॅनाकोंडाचा समावेश आहे. या सापांची तुलना जगातील सर्वात मोठ्या सापांमध्ये केली जाते. सोशल मीडियावर (Social media) अशाच अॅनाकोंडा सापाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या व्हिडिओत अॅनाकोंडा साप एका व्यक्तीवर जोरदार हल्ला करताना दिसत आहे.

मात्र, त्या व्यक्तीला या सापाच्या हल्लामुळं फारसं नुकसान झालेलं नाही. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एका मोठा अॅनाकोंडा सापाने एका व्यक्तीच्या हाताला पिळ घातलेला दिसत आहे. त्याच्या हातांना त्या सापाने जखडून ठेवलं आहे. याचा फायदा घेवून अॅनाकोंडा त्या व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे. आधी त्याचा पोटावर हल्ला करतो आणि त्यानंतर हातावर चावण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ मधील हे दृष्य पाहून अंगावर शहारा येईल.

Anaconda viral video
Sanjay Raut : राऊतांच्या घरात आनंदाचं वातावरण; पत्नी वर्षा राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

अॅनाकोंडाचा हा थरारक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर nickthewrangler नावाच्या आयडीने शेअर केला आहे. आतापर्यंत जवळपास 3.8 कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सने कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत म्हटलं, घाबरू नको तो विषारी साप नाहीय. त्याला कदाचित भूख लागली असेल, त्यामुळे तो हल्ला करत आहे, असंही एका युजरने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com