Amit Shah on No-Confidence Motion : जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला, अमित शाहांचं विरोधकांवर टीकास्त्र

Amit Shah in Loksabha : लोकसभेत आतापर्यंत 27 अविश्वास आणि 11 विश्वास प्रस्ताव आले आहेत.
Amit Shah On Delhi Services Bill
Amit Shah On Delhi Services BillSaam Tv
Published On

No Confidence Motion : मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्तावावर सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांनी आज चर्चेला सुरुवात केली. आता विरोधकांच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं.

लोकसभेत आतापर्यंत 27 अविश्वास आणि 11 विश्वास प्रस्ताव आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळावर कोणाचाही अविश्वास नाही. विरोधकांचा अविश्वास आणण्याचा उद्देश केवळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली.  (Latest Marathi News)

Amit Shah On Delhi Services Bill
Smriti Irani News: राहुल गांधींनी मला फ्लाईंग किस दिला; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप, भाजप आक्रमक

मोदी लोकप्रिय पंतप्रधान

मोदी सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. मोदी १७ तास काम करणारे पंतप्रधान आहेत. म्हणूनच मोदी सरकारला दोन वेळा पूर्ण बहूमत मिळालं. मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या काळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, याची आठवणही अमित शाह यांनी करुन दिली. (Political News)

Amit Shah On Delhi Services Bill
Rahul Gandhi Speech: रावण दोघांचं ऐकायचा; तसेच मोदीही... राहुल गांधी संसदेत तुफान बरसले; वाचा भाषणातील ५ प्रमुख मुद्दे

काँग्रेसचे चारित्र्य भ्रष्टाचाराचे

देशात २०१४ पासून विकासाला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदींनी देश परिवारवाद आणि भ्रष्टाचारातून मुक्त केला. केवळ सत्तेत राहणे हे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे. काँग्रेसचे चारित्र्य भ्रष्टाचाराचे आहे. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरिबी तशीच राहिली. पण मोदींनी गरिबी पाहिल्यामुळे समस्या समजल्या आणि चित्र बदललं, असं अमित शाह यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com