अमेरिकेचा चीनला मोठा दणका! Huawei-ZTE सह ५ कंपन्यांच्या दूरसंचार उपकरणांवर घातली बंदी

अमेरिकेने 'राष्ट्रीय सुरक्षेचे' कारण देत चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घातली आहे.
America vs China
America vs China Saam TV
Published On

America vs China : अमेरिका आणि चीनमधील वाद सध्या वाढताना दिसत आहेत. अमेरिकेने चीनच्या प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांवर मोठा हातोडा मारला आहे. अमेरिकेने 'राष्ट्रीय सुरक्षेचे' कारण देत चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घातली आहे. चीनच्या Huawei, ZTE या कंपन्यांसह ५ चिनी कंपन्यांनी बनवलेल्या दळणवळण उपकरणांच्या विक्रीवर अमेरिकेने बंदी घातली आहे.  (Latest Marathi News)

America vs China
Petrol Diesel Price : खुशखबर! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जो बिडेन प्रशासनाने चीनच्या Huawei Technologies आणि ZTE कडून नवीन दूरसंचार उपकरणांच्या मंजुरीवर बंदी घातली आहे. या कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी 'अस्वीकार्य धोका' ठरत आहे, असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. FCC म्हणजेच यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने शुक्रवारी याबाबतची घोषणा केली आहे.

अमेरिकेच्या या निर्णयाचा अर्थ असा आहे की आता या पाच कंपन्या चीनकडून वस्तू खरेदी करून अमेरिकेत विकू शकत नाहीत. याशिवाय त्यांची उत्पादने अमेरिकेत विक्रीसाठी मंजूरही होणार नाहीत. अमेरिकेला भीती वाटते की बीजिंग चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचा वापर अमेरिकन लोकांची हेरगिरी करण्यासाठी करू शकते.

America vs China
Maharashtra Politics : शिंदे गट आज गुवाहाटी जाणार; कामाख्या देवीचं दर्शन घेणार, काही आमदार नाराज?

FCC चेअर जेसिका रोसेनवॉर्सेल यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की हे नवीन नियम दूरसंचार संबंधित राष्ट्रीय सुरक्षा धोक्यांपासून अमेरिकन लोकांचे संरक्षण करण्यासाठी आमच्या चालू असलेल्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, अमेरिकेच्या या कारवाईवर हुवाईने काहीही बोलण्यास नकार दिला. एवढेच नाही तर जेटीई, दाहुआ, हिकव्हिजन आणि हायटेरा यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला.

खरंच, मार्च 2021 मध्ये तथाकथित 'कव्हर लिस्ट'ने यूएस कम्युनिकेशन नेटवर्क्सचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 2019 च्या कायद्यानुसार Huawei, ZTE, Hytera Communications Corp Hikvision आणि Dahua या पाच चिनी कंपन्यांची नावे दिली. महत्वाची बाब म्हणजे, राष्ट्रीय सुरक्षेचा धोका लक्षात घेता बायडेन प्रशासनाच्या या निर्णयाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघांनीही पाठिंबा दिला आहे. FCC जून 2021 पासून या सर्व कंपन्यांसाठी सर्व डिव्हाइस अधिकृततेवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com